‘भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे', हे वचन ऐकल्यावर डोळ्यासमोर जे चित्र उभा राहते ते म्हणजे श्री स्वामी समर्थ (Shree Swami Samarth) अर्थात अक्कलकोट स्वामी. श्रीपाद वल्लभ व श्रीनृसिंहसरस्वती यांच्या नंतरचे भगवान श्रीदत्तात्रेयांचे ते तिसरे पूर्णावतार अवतार आहेत. पौराणिक आधारानुसार, चैत्र शुद्ध द्वितीया हा दिवस श्री स्वामी समर्थ यांचा प्रकट दिन म्हणून ओळखला जातो. तर स्वामींनी चैत्र वद्य त्रयोदशीच्या दिवशी अक्कलकोट येथील 'वटवृक्ष समाधी मठ स्थानी' माध्याह्न समयी आपल्या अवतारकार्याची समाप्ती केली, असे मानले जाते. उद्या स्वामी समर्थांची पुण्यतिथी आहे.
इ.स. 1459 मध्ये, माघ वद्य 1, शके 1380 या दिवशी श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांनी गाणगापुरास निर्गुण पादुका स्थापन केल्या व त्यानंतर शैल यात्रेचे निमित्त साधून ते कर्दळीवनात अदृश्य झाले. त्त्यानंतर 300 वर्षानंतर अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज प्रकट झाले. पुढे स्वामींनी अनेकांना कामाला लावून इसवी सन 1878 मध्ये त्यांचा एक आविष्कार संपविला.
स्वामी समर्थ यांच्या पुण्यतिथी निमित्त Facebook, WhatsApp किंवा इतर सोशल मिडियाच्या माध्यमातून HD Images, Wallpapers शेअर करून महाराजांना करा कोटी कोटी प्रणाम.
दरम्यान, स्वामींनी श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे शेगावचे श्री गजानन महाराज व शिर्डीचे श्री साई महाराज यांना दीक्षा दिली. त्यानंतर स्वामी पंढरपूर, मोहोळ असे भ्रमण करीत सोलापुरास आले. त्यानंतर मंगळवेढे येथे स्वामींनी काही काळ वास्तव्य केले. 1856 मध्ये स्वामी महाराजांनी अक्कलकोटमध्ये प्रवेश केला व तिथे त्यांचे 22 वर्षे वास्तव्य राहिले.