Shravan Special Rangoli: महाराष्ट्रात आज, 21 जुलै पासून श्रावण महिन्याला आरंभ होत आहे. श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा/सणांचा राजा म्हटले जाते. श्रावण महिन्यातील प्रत्येक वारी कोणत्या ना कोणत्या देवतेची पूजा वा व्रत करण्याची हिंदू धर्मीयांची परंपरा आहे. या विशिष्ट महिन्यात केल्या जाणाऱ्या शंकराच्या उपासनेला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. आज सुद्धा पार्वती चे पूजन करून घरोघरी मंगळागौरीचे व्रत केले जाईल. आजच्या या पवित्र दिवशी घरातील वातावरण अधिक प्रसन्न करण्यासाठी तुम्ही दारात किंवा देवासमोर छान, छोटीशी, सुंदर रांगोळी काढू शकता. हा महिना श्री शंकराच्या आवडीचा महिना म्हणून ओळखला जातो, त्यामुळे देव्हार्याच्या समोर शंकराची पिंड आणि तशीच शोभेशी नाजूक रांगोळी काढता येईल. या महिन्यात निसर्ग आपल्या कोवळ्या- नाजूक रूपात पाहायला मिळतो, त्यामुळे रांगोळी सुद्धा अगदी भली मोठी न काढता पानाफुलांच्या नाजुक वेलीच्या रूपात काढली तरी शोभून दिसते. चला तर मग अशाच काही सोप्प्या रांगोळ्यांचे नमुने आपण पाहुयात..
श्रावण विशेष सोप्पी रांगोळी
आज मंगळागौरीचे व्रत केले जाणार आहे, या मासातील यंदाचे हे पहिले व्रत असेल. त्यामुळे पूजा करताना तुम्ही या काही खास मंगळागौर रांगोळ्या सुद्धा ट्राय करू शकता. Mangalagaur 2020 Ukhane: श्रावण महिन्यातील मंगळागौर पुजा, खेळ दरम्यान नाव घेण्याचा हट्ट पुरवण्यासाठी खास उखाणे
मंगळागौर विशेष रांगोळी
दरम्यान, मागील काही महिन्यांपासून आपल्याला सर्व सण, उत्सव घरातूनच साजरे करावे लागत आहेत, याच नियमाचे पालन करत आपल्या पद्धतीने आनंद साजरा करा, श्रावणाचे स्वागत करा शेवटी जागेपेक्षा आनंद महत्वाचा हो ना? तुम्हाला सर्वांना श्रावणाच्या खूप खूप शुभेच्छा!