Shravan Maas 2020 Marathi Wishes: आपल्याकडे सण समारंभ, व्रत वैकल्य यांची कमतरता नाही. वर्षभरात अनेक सण येतात पण श्रावण महिना सणांनी समृद्ध आहे. श्रावण महिन्यात निसर्गातील वातावरण अगदी उत्साहवर्धक असते. त्यामुळे साहजिकच चैतन्य निर्माण होते आणि सणांमुळे मंगलता प्राप्त होते. श्रावण महिन्याच्या सुरुवातीला नागपंचमीचा सण येतो आणि महिन्याची सांगता पिठोरी साजरी करुन होते. त्याचबरोबर शंकराचे व्रत, मंगळागौर, जिवंतिका पूजन यांसह विविध व्रत वैकल्य श्रावण आपल्या सोबतीला घेऊन येतो. यंदा श्रावण महिन्याचा प्रारंभ लवकर होत आहे. 21 जुलै रोजी श्रावणमासारंभ होणार असून 19 ऑगस्ट रोजी श्रावण महिना समाप्त होईल. हिंदु धर्मियांमध्ये श्रावण महिन्याला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे श्रावणाची चाहुल लागताच सगळीकडे उत्साही वातावरण निर्माण होते.
श्रावण महिन्याच्या शुभेच्छा देण्यासाठी मराठमोळे शुभेच्छा संदेश, WIshes, Messages, Quotes सोशल मीडियाच्या फेसबुक, व्हॉट्सअॅप, इंस्टाग्राम या विविध माध्यमातून तुम्ही शेअर करु शकता. आपले नातेवाईक, मित्र परिवार, प्रियजन यांच्यासह श्रावणमासारंभाच्या शुभेच्छा शेअर करुन श्रावण महिन्याचे आनंदात स्वागत करा.
श्रावणमासारंभ शुभेच्छा!
रंग रंगात रंगला श्रावण
नभ नभात उतरला श्रावण
पान पानात लपला श्रावण
फुल फुलात उमलला श्रावण
श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा!
बघा निसर्ग बहरलाय
गारव्याने देहही शहारलाय
मनही थोडं मोहरून घ्या
आलाय पाऊस भिजून घ्या
श्रावणमासाच्या हार्दिक शुभेच्छा!
सणासुदीची घेऊन उधळण,
आला हसरा श्रावण..!
कर्तव्य आणि नात्यांची देतो आठवण..!
परंपरेचे करूया सर्व मिळुन जतन..!
अनमोल ठेवा संस्कृतीचा राखुया आपण..!
आला हसरा श्रावण..!
'श्रावणा'च्या मंगलमय शुभेच्छा!
नटली सृष्टी बदलली दृष्टी, आनंद मावेना मनात
हासत, नाचत, गात-गात श्रावण आला अंगणात
श्रावण मासाच्या मन:पूर्वक शुभेच्छा!
हासरा नाचरा जरासा लाजरा,
सुंदर साजिरा श्रावण आला
श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा!
श्रावण मासाचे वर्णन करण्याचा मोह अनेक लेखक, कवींनाही आवरला नाही. त्यामुळे अनेकांनी आपल्या लेखणीतून श्रावणाचे वर्णन केले आहे. दरम्यान कोरोना व्हायरसचे संकट असले तरी श्रावण महिन्याचे अगदी आनंदाने स्वागत करा आणि विविध सणांचा आस्वाद घ्या. सुंदर निसर्गरम्य वातावरण अनुभवा. तुम्हा सर्वांना लेटेस्ली मराठी कडून श्रावण महिन्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा!