
Shivrajyabhishek Sohala 2023 Messages: मराठा साम्राज्याचे संस्थापक आणि प्रथम छत्रपती शिवाजी महाराज (Chatrapati Shivaji Maharaj) यांच्या राज्याभिषेक सोहळ्याला (Shivrajyabhishek Sohala 2023) आज 350 वर्षे पूर्ण झाली. महाराजांनी विजापूरच्या आदिलशाहीविरुद्ध आणि मोगल साम्राज्याविरुद्ध संघर्ष करून स्वतंत्र मराठा साम्राज्याची स्थापना केली होती. आज संपूर्ण महाराष्ट्रात 350 वा शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळा साजरा होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शालिवाहन शके 1596 म्हणजेच 6 जून 1674 रोजी स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला आणि एका सार्वभौम राज्याच्या जयघोष झाला.
परकीय शत्रूवर वचक आणि जरब बसवण्यासाठी शिवाजी महाराजांना राज्याभिषेक करून घेणे गरजेचे होते. स्वराज्याला सार्वभौम स्वतंत्र राज्य म्हणून सर्वमान्य मान्यता मिळावी म्हणूनही राज्याभिषेक होणे गरजेचे होते. यासाठी शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक करून घेतला. राज्याभिषेक झाल्यानंतर संपूर्ण जगात त्यांना छत्रपती ही पदवी मिळाली. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा भारताच्या इतिहासातील एक अत्यंत महत्वाचा प्रसंग होता. राज्याभिषेकावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी छत्रपती हे पद धारण केले. छत्रपती म्हणजे सार्वभौम आणि सर्वेसर्वा. राज्याच्या कारभारासाठी अष्टप्रधान मंडळाची निर्मिती केली.
तर आजच्या दिवसाचे औचित्य साधत खास Images, Whatsapp Status, Wishes, Quotes, Greetings, Messages शेअर करून तुम्ही साजरा करू शकता शिवराज्याभिषेक सोहळा





दरम्यान, काशीचे विद्वान पंडित गागाभट्ट यांनी महाराजांचा राज्याभिषेक केला. छत्रपतींच्या राज्याभिषेकासाठी खास 32 मन सोन्याचे सिंहासन बनवून घेण्यात आले. गागाभट्टांनी शिवराज्याभिषेकासाठी ‘तुला पुरुष दान विधी’ व ‘राज्याभिषेक प्रयोग’ हे दोन ग्रंथ तयार करून घेतले. राज्याभिषेक करण्यापूर्वी छत्रपतींची मुंजा करण्यात आली. राज्याभिषेक करण्यासाठी महाराजांची सुवर्णतुला करण्यात आली. राज्याभिषेकासाठी महाराजांचे त्यांच्या पत्नींसोबत विधिवत विवाह करण्यात आले. अशाप्रकारे हा राज्याभिषेक सोहळा नऊ दिवस चालला.
छत्रपतींचा राज्याभिषेक झाल्यानंतर राजांनी शिवशक ही नवीन कालगणना सुरु केली. शिवराज्याभिषेकानंतर महाराजांनी शिवराई व होन या दोन चलनाची निर्मिती केली. शिवराई ही चांदीची नाणी व होन ही सोन्याची नाणी चलनात आणली. शिवरायांनी राज्याभिषेक झाल्यानंतर राज्यकारभारासाठी मराठी भाषेचा वापर केला.