List of Chhatrapati Shivaji Maharaj Battles: शिवजयंती निमित्ताने जाणून घ्या छत्रपती शिवाजी महाराज यांनी केलेल्या लढायांची यादी
छत्रपति शिवाजी महाराज (Photo Credits: Instagram)

छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर शहाजी राजे यांच्या पत्नी जिजाबाई यांच्या पोटी झाला. शिवाजी महाराज हे एक योद्धा आणि जनतेचा राजा होते. मुघल राजवटीविरुद्ध उभे राहण्याचे अतुलनीय धैर्य त्यांच्याके होते. म्हणूनच ते रयतेचे राज्य उभा करु शकले. त्यांचे मूळ नाव शिवाजी भोसले होते परंतु त्यांच्या कारभारामुळे आणि नेतृत्वामुळे ते 'छत्रपती' (Chhatrapati) झाले. छत्रपती शिवाजी महाराज (List of Chhatrapati Shivaji Maharaj Battles) यांची त्यांच्या एकूण आयुष्यामध्ये केलेल्या लढायांची यादी इथे देत आहोत. ज्यामुळे अनेक शिवभक्तांना मिळू शकते प्रेरणा.

सतराव्या शतकाच्या सुरुवातीस पुणे प्रांतातील भोसले कुटुंबाला स्थानिक आणि अहमदनगर राज्याचे सहकार्य लाभले. त्यानंतर नव्या मराठा सरदाराच्या सत्तेचा उदय होऊ लागला. याच काळात त्यांना विशेष अधिकार प्राप्त झाले. ज्यामुळे त्यानी आपल्या सैन्यात मराठी सरदार आणि सैनिकांची भरती केली. शिवाजी महाराज हे एक निष्णात सैनिक आणि कुशल प्रशासक होते. त्यांना लढाईची सर्व अंगे बारकाईने ठाऊक होती. त्यामुळे त्यांनी आपल्या आयुष्यात विविध लढाया जिंकल्या. काही तहही केले. या लढायांची यादी इथे देत आहोत. (हेही वाचा, Shivaji Maharaj Jayanti 2022 Wishes: छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त मराठी WhatsApp Status, Facebook Messages द्वारे द्या खास शुभेच्छा!)

छत्रपती शिवाजी महाराजांनी लढलेल्या युद्धांची यादी

प्रतापगडाची लढाई

10 नोव्हेंबर 1659 रोजी सातारा शहराजवळील प्रतापगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज आणि आदिलशाही सेनापती अफझलखान यांच्यात लढाई झाली.

कोल्हापूरची लढाई

28 डिसेंबर 1659 रोजी महाराष्ट्रातील कोल्हापूर शहराजवळ छत्रपती शिवाजी आणि आदिलशाही फौजा यांच्यात लढाई झाली.

पावनखिंडीची लढाई

सरदार बाजी प्रभू देशपांडे आणि आदिलशहाचा सिद्दी मसूद यांच्यात 13 जुलै 1660 रोजी कोल्हापूर शहराजवळील किल्ले विशाळगडाच्या परिसरातील डोंगराच्या खिंडीत लढाई झाली.

चाकणची लढाई

1660 मध्ये मराठा साम्राज्य आणि मुघल साम्राज्य यांच्यात लढाई झाली.

उंबरखिंडची लढाई

2 फेब्रुवारी 1661 रोजी छत्रपती शिवाजीच्या नेतृत्वाखालील मराठा आणि मुघलांचा कारतलाब खान यांच्यात लढाई झाली.

सुरतची लूट

5 जानेवारी 1664 रोजी, छत्रपती शिवाजी महाराज आणि इनायत खान, एक मुघल कप्तान यांच्यात भारतातील गुजरातमधील सुरत शहराजवळ लढाई झाली.

पुरंदरची लढाई

1665 मध्ये मुघल साम्राज्य आणि मराठा साम्राज्य यांच्यात लढाई झाली.

सिंहगडाची लढाई

4 फेब्रुवारी, 1670 रोजी सिंहगड किल्ल्यावर पुणे, महाराष्ट्र, भारतातील मराठा शासक शिवाजी महाराजांचे सेनापती तानाजी मालुसरे आणि मुघल सेनापती जयसिंग प्रथमच्या अधिपत्याखालील किल्लेदार उदयभान राठोड यांच्यात लढाई झाली.

कल्याणची लढाई

1682 ते 1683 दरम्यान लढले ज्यात मुघल साम्राज्याच्या बहादूर खानने मराठा सैन्याचा पराभव करून कल्याण ताब्यात घेतले.

भूपालगडची लढाई

1679 मध्ये मुघल आणि मराठा साम्राज्यांमध्ये लढाई झाली ज्यामध्ये मुघलांनी मराठ्यांचा पराभव केला.

संगमनेरची लढाई

1679 मध्ये मुघल साम्राज्य आणि मराठा साम्राज्य यांच्यात लढले गेले. मराठा राजा शिवाजीने लढलेली ही शेवटची लढाई होती.

छत्रपती शवाजी महाराज यांनी वयाच्या 18 व्यावर्षीच आपला पराक्रम दाखवून दिला. त्यांनी पुणे-रायगड, कोमडाणा आमि तोरणा जवळील अनेक डोंगरी किल्ले जिंकले. 1656 मध्ये त्यांनी जावळी जिंकल्यावर मराठा सरदार चंद्रराव मोरे यांच्याकडून जिंकून घेतले आणि विजयाची खरी कारकीर्द सुरू केली. जावळीच्या विजयामुळे ते मावळा क्षेत्राचे म्हणजेच उंच प्रदेशाच निर्विवाद स्वामी बनले. त्यामुळे सातारा परिसर आणि कोकण किनारपट्टीपर्यंतचा त्यामचा मार्ग मोकळा झाला. वरील यादीतील छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेल्या लढायांची यादी वाचकांच्या सामान्य ज्ञानात भर या हेतूने दिली आहे.