कोरोना व्हायरस महामारीमुळे, यंदा शिवजयंती पूर्वीसारखी उत्साहात सार्वजनिक रित्या साजरी केला जाणार नाही.छत्रपती शिवाजी महाराज जयंती किंवा शिव जयंती हा महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध सण व उत्सव आहे. हा सण मराठा साम्राज्यातील संस्थापक शिवाजी महाराज यांच्या जन्मदिवसानिमित्त महाराष्ट्र सरकारने निश्चित केल्याप्रमाणे हा सण19 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रभर साजरा केला जातो.प्रत्येक विशेष प्रसंगी रांगोळी काढण्याची आपली परंपरा आहे, म्हणून प्रत्येक उत्सवाच्या निमित्ताने आपण आपले घर रांगोळी, तोरण, दिवे इत्यादींनी सजवतो. ( Shiv Jayanti 2021: कडबा वापरुन अर्ध्या एकरात साकारली शिवप्रतिमा; सोलापूर येथील महाविद्यालयीन युवकांची कलात्मकता (पाहा VIDEO)
रांगोळी ही भारताची प्राचीन सांस्कृतिक परंपरा आणि लोक-कला आहे.भारताच्या वेगवेगळ्या प्रांतात रांगोळीचे वैविध्य दिसून येते पण त्यामागील निहित भावनेत आणि संस्कृतीमध्ये बरीचशी समानता आहे.रांगोळीचा हेतू म्हणजे शक्ती, उदारता जाणवणे आणि नशीब मिळविणे हे आहे. परंपरा, लोकसाहित्य आणि प्रत्येक क्षेत्रासाठी खास असलेल्या पद्धती प्रतिबिंबित केल्यामुळे डिझाईनचे वर्णनदेखील भिन्न असू शकते. हे पारंपरिकपणे मुली किंवा महिलांनी केले आहे. साधारणता, सण, शुभ उत्सव, विवाह उत्सव आणि इतर समान टप्पे आणि मेळावे यासारख्या प्रसंगांमध्ये रांगोळ्या काढतात.
आज आपण पाहणार आहोत शिव जयंती निमित्त खास सोप्या आणि आकर्षक रांगोळी डिझाइन.
शिव जयंती स्पेशल रांगोळी
शिव जयंती स्पेशल रांगोळी
शिव जयंती स्पेशल रांगोळी
शिव जयंती स्पेशल रांगोळी
महाराष्ट्र सरकारने 2001 मध्ये फाल्गुन वद्य तृतीया, 1551 (शुक्रवार. 19 फेब्रुवारी 1630) ही छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मतारीख म्हणून स्वीकरली आहे. त्यामुळे त्या दिवशी सरकारी सुट्टी जाहीर करून शिवजयंतीचा उत्सव साजरा केला जातो. या व्यतिरिक्त संभाव्य तारखांमध्ये 6 एप्रिल 1627 (वैशाख शुद्ध तृतीया) ही जन्मतारीख होती. त्यानुसार अनेक शिवभक्त शिवजयंतीचा दिवस म्हणून वैशाख शुद्ध तृतीया या दिवशी शिवजयंतीचा उत्सव साजरा करतात. महाराष्ट्रामध्ये अनेक शिवभक्त मराठी पंचांगाप्रमाणे फाल्गुन वद्य तृतीया हा दिवस शिवजयंती म्हणून सेलिब्रेट करतात. परंतू वेगवेगळ्या दिनदर्शिकांमध्ये वेगवेगळी तारीख दाखवली जाते.