Chhatrapati Shivaji Maharaj | (Photo Credit: Twitter)

शिवजयंती 2021 ( Shiv Jayanti 2021) चे निमित्त साधून सोलापूरात एक अनोखी किमया साधण्यात आली आहे. सोलापूर (Solapur) येथील काही महाविद्यालयीन युवकांनी चक्क कडबा (Kadaba) वापरुन शिवप्रतिमा साकारली आहे. छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांची ही प्रतिमा दहा, विस फूट नव्हे तर तब्बल अर्ध्या एकरात साकारली आहे. सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या बाळे गावात ही प्रतिमा पाहायला मिळते. या प्रतिमेचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ही शिवप्रतिमा पाहण्यासाठी शिवप्रेमिंची मोठी गर्दी पाहयला मिळते आहे.

प्राप्त माहितीनुसार,प्रतिक तांदळे, अभिजय गायकवाड, विवेक उरडे, सुमित काटाळे, गौरव शिंदे, अभिषेक बोरकर, प्रदीप शिंगाडे, समर्थ जोशी, बालाजी आंबुरे या युवकांनी ही शिवप्रतिमा तयारकेली आहे. हे सर्वजण सिंहगड महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत. शिवजयंती निमित्त अनेक वेळा साकारण्यात येणाऱ्या प्रतिमा आणि पुतळे हे प्लास्टर ऑफ पॅरीस किंवा इतर गोष्टींपासून तयार केल्या जातात. ज्या पर्यावरण पुरक नसतात. त्यामुळे यंदाच्या वर्षी पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत पर्यावरण पूरक शिवप्रतिमा निर्माण करण्याचा या वद्यार्थ्यांनी निश्चय केला.

अर्थ्या एकरामध्ये सुमारे 140 फूट लांब आणि 75 फूट इतक्या आकारमानाची प्रतिमा साकारण्यासाठी साधारण 10 दिवस इतका कालावधी लागला. ही प्रतिमा साकारण्यासाठी कडब्याचा वापर करण्यात आला.

कडबा म्हणजे काय?

ज्वारीचे पीक मोठे झाले की त्याची कणसे काढून घेतली जातात. उरलेले ज्वारीचे ताट सूर्यप्रकाशात वाळवले जाते. तत्पूह्वी ही ताटे ओली असताना अनेक ताटे एकत्र घेऊन त्याची एक पेंडी बनवली जाते. अशा सुकलेल्या ताटांना किंवा त्यांच्या पेंड्यांना कडबा म्हटले जाते.