
Shiv Jayanti Tithi 2022 Messages: दरवर्षी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती 19 फेब्रुवारीला साजरी केली जाते. मात्र, तिथीनुसार साजरी केली जाणारी शिवजयंती दरवर्षी वेगवेगळ्या तारखेला साजरी केली जाते. यंदा तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती 21 मार्च रोजी साजरी केली जाणार आहे. काही लोकांचा असा विश्वास आहे की, शिवाजी महाराजांची जन्मतारीख इंग्रजी कॅलेंडरच्या आधारावर ठरवली जावी. त्याच वेळी, काही लोकांचे मत आहे की, शिव जयंती हिंदू कॅलेंडरच्या आधारावर ठरवली जावी.
इंग्रजी कॅलेंडनुसार शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 मध्ये झाला. परंतु, हिंदू पंचांगानुसार, शिवरायांचा जन्म फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तिसऱ्या तिथीला, 1551 शके संवत्सरला झाला. त्यामुळे काही लोक या दोन वेगवेगळ्या दिवशी शिवरायांची जयंती साजरी करता. छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त Wishes, Greetings, WhatsApp Quotes, Images शेअर करून तुम्ही शिवजयंती साजरी करू शकता. खालील ईमेज डाऊनलोड करून तुम्ही आपल्या मित्र-परिवारास शिवजयंतीच्या मराठमोळ्या शुभेच्छा देऊ शकता.
शूरता हा माझा आत्मा आहे!
विचार आणि विवेक ही माझी ओळख आहे!
क्षत्रिय हा माझा धर्म आहे!
छत्रपती शिवराय हे माझे दैवत आहे!
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या शुभेच्छा

अखंड हिंदुस्थान चे आराध्य दैवत व स्फूर्ती स्थान,
श्रीमंत छत्रपती शिवाजी राजे महाराजांना,
त्रिवार मानाचा मुजरा…
सर्व शिवभक्तांना,
शिवजयंतीच्या शिवमय शुभेच्छा…!!

सिंहाची चाल,
गरुडा ची नजर,
स्रीयांचा आदर,
शत्रूचे मर्दन,
असेच असावे मावळ्यांचे वर्तन,
हीच छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण…
शिवजयंतीच्या शिवमय शुभेच्छा…!!

ज्या मातीत जन्मलो
तीचा रंग सावळा आहे..
सह्याद्री असो वा हिमालय,
छाती ठोक सांगतो,
मी_छत्रपती_शिवरायांचा_मावळा_आहे..!
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!

इतिहासाच्या पानावर, रयते च्या मनावर,
मातिच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर,
राज्य करणारा राजा म्हणजे, राजा शिवछत्रपती..
मानाचा मुजरा!
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा…!

महाराष्ट्र सरकारने 1966 मध्ये एक समिती स्थापन करून शिवाजी महाराजांची नेमकी जन्मतारीख निश्चित करण्यास सांगितले. समितीमध्ये महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार, एनआर फाटक, एजी पवार, जीएच खरे, व्हीसी बेंद्रे, बीएम पुरंदर आणि मोरेश्वर दीक्षित यांचा समावेश होता. या समितीच्या पहिल्या बैठकीला ए.जी.पवार उपस्थित राहू शकले नाहीत. त्यानंतर पोतदार, खरे, बेंद्रे, पुरंदरे आणि दीक्षित यांनी शिवाजीची जन्मतारीख फागुन वद्य तृतीया शके 1551 (19 फेब्रुवारी 1630) असल्याचे मान्य केले.