Mahatma Gandhi Punyatithi 2023 Quotes: महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त शेअर करा त्यांचे 'हे' खास प्रेरणादायी विचार
Mahatma Gandhi Quotes (PC - File Image)

Mahatma Gandhi Punyatithi 2023 Quotes: इंग्रजांच्या गुलामगिरीतून देशाला मुक्त करणाऱ्या भारतातील एक शूर स्वातंत्र्यसैनिक मोहनदास करमचंद गांधी यांनी आयुष्यभर सत्य आणि अहिंसेचे पालन केले. या मार्गाचा अवलंब करून त्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. महात्मा गांधींना राष्ट्रपिता अशी पदवी मिळाली. तसेच लोक त्यांना प्रेमाने बापू म्हणत असतं. स्वातंत्र्यानंतर काही महिन्यांनी म्हणजे 30 जानेवारी 1948 रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे निधन झाले. खरं तर, नथुराम गोडसेने त्या संध्याकाळी दिल्लीतील बिर्ला हाऊसमध्ये प्रार्थनेदरम्यान महात्मा गांधींच्या छातीत तीन गोळ्या झाडल्या. म्हणून हा दिवस गांधीजींची पुण्यतिथी म्हणून साजरा केला जातो. यासोबतच याला हुतात्मा दिन असेही म्हणतात.

भारतात, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची पुण्यतिथी 30 जानेवारी रोजी शहीद दिन म्हणून साजरी केली जाते आणि प्रत्येकजण त्यांना स्मरण करतो आणि श्रद्धांजली अर्पण करतो. बापूंनी सत्य आणि अहिंसा हे इंग्रजांविरुद्धचे सर्वात शक्तिशाली शस्त्र बनवले होते, त्यामुळे आजही त्यांचे विचार लोकांसाठी प्रेरणास्त्रोत आहेत. महात्मा गांधींच्या 75 व्या पुण्यतिथीनिमित्त, तुम्ही बापूंचे खालील महान विचार तुमच्या प्रियजनांसोबत शेअर करू शकता.

Mahatma Gandhi Punyatithi 2023 Quotes (PC - File Image)
Mahatma Gandhi Punyatithi 2023 Quotes (PC - File Image)
Mahatma Gandhi Punyatithi 2023 Quotes (PC - File Image)
Mahatma Gandhi Punyatithi 2023 Quotes (PC - File Image)
Mahatma Gandhi Quotes (PC - File Image)
Mahatma Gandhi Quotes (PC - File Image)
Mahatma Gandhi Quotes (PC - File Image)
Mahatma Gandhi Quotes (PC - File Image)
Mahatma Gandhi Quotes (PC - File Image)

विशेष म्हणजे या दिवशी राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान आणि संरक्षण मंत्री दिल्लीतील राजघाटावर गांधीजींना आदरांजली वाहतात. देशभरात बापू आणि शहीदांच्या स्मरणार्थ दोन मिनिटांचे मौन पाळण्यात येते. एकीकडे 30 जानेवारीला महात्मा गांधी यांची पुण्यतिथी हुतात्मा दिन म्हणून साजरी केली जाते, तर दुसरीकडे 23 मार्चला भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांच्या बलिदानाचे स्मरण करून शहीद दिन साजरा केला जातो.