Shahu Maharaj Jayanti Marathi Wishes: शाहू महाराज यांचा जन्म 26 जून 1874 साली घाटगे घरण्यात झाला. त्यांचे मूळ नाव यशवंत. कोल्हापूरचे संस्थानाचे राजे चौथे शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी आनंदीबाई यांनी 17 मार्च 1884 साली यशवंतरावांना दत्तक घेतलं. त्यानंतर त्यांचे 'शाहू' असे नामकरण करण्यात आले. अवघ्या 20 व्या वर्षी त्यांचा राज्याभिषेक झाला. त्यानंतर तब्बल 28 वर्ष कोल्हापूर संस्थानाचे ते राजे होते. 'छत्रपती शाहू महाराज', 'राजर्षी शाहू महाराज', 'कोल्हापूरचे शाहू', 'चौथे शाहू' अशा अनेक नावांनी त्यांना ओळखले जाते. आज त्यांची जयंती. त्यांचे विचार पुढील पिढीपर्यंत पोहचवण्यासाठी जयंती निमित्त अनेक कार्यक्रमांचे आयोजन करुन त्यांना मानंवदना दिली जाते. त्यांनी समता, बंधूतेचा संदेश दिला. दलितांवरील अन्याय दूर करण्यासाठी ते अखंड झटले.
राजर्षी शाहु महाराज यांच्या जयंती निमित्त खास मराठी शुभेच्छा संदेश, Wishes, Messages, Quotes, Imgaes, Greetings सोशल मीडियाच्या फेसबुक (Facebook), ट्विटर (Twitter), व्हॉट्सअॅप (WhatsApp), टेलिग्राम (Telegram), इंस्टाग्राम (Instagram) वर शेअर करुन लोककल्याणकारी राजाच्या स्मृतीस करा अभिवादन.
राजर्षी शाहु महाराज यांच्या जयंती निमित्त शुभेच्छा संदेश!
राजातील माणूस आणि
माणसातील राजा
लोकराजा
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना
जयंती निमित्त विनम्र अभिवादन!
थोर समाजसुधारक
राजर्षी शाहू महाराज
यांना जयंती निमित्त कोटी कोटी प्रणाम!
समता, बंधुता यांची शिकवण देणारे
लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांना
जयंती निमित्त त्रिवार अभिवादन!
संपूर्ण महाराष्ट्राचे प्रेरणास्त्रोत
दीन-शोषितांचे तारणहार,
थोर समाजसुधारक
राजर्षी शाहू महाराज यांना
जयंतीनिमित्त मानाचा मुजरा!
आपली राजसत्ता खऱ्या अर्थाने
वंचित समाजासाठी वापरणारे
आरक्षणाधीश
लोकराजा राजर्षी शाहू महाराज
यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
शाहू महाराजांनी बहुजन समाजासाठी शिक्षण सक्तीचे आणि मोफत केले. अस्पृश्य, दलितांची प्रगती व्हावी म्हणून त्यांनी आरक्षण लागू केले. जातीयता कमी करुन समाजात समता आणण्यासाठी त्यांनी प्रचंड कार्य केले. त्यासाठी त्यांनी आंतरजातीय विवाहाला मान्यता दिली. विधवा विवाहास मान्यता दिली. स्त्रियांवरील अत्याचार दूर करण्यासाठी मोलाचे योगदान दिले. व्यापार, कला, क्रीडा, साहित्य व इतर कलांना प्रोत्साहन दिले. विशेष म्हणजे छत्रपती शाहू महाराजांचे कार्य संस्थांनापुरते मर्यादित नव्हते, तर ते संपूर्ण महाराष्ट्रभर पसरले होते.