
Guru Nanak Jayanti 2023 Messages: शीख धर्माचे संस्थापक गुरू नानक यांचा जन्म 1469 मध्ये कार्तिक महिन्याच्या पूरणमशीला, विक्रम संवत कॅलेंडरनुसार, सध्याच्या पाकिस्तानच्या शेखुपुरा जिल्ह्यातील राय-भोई-दी तलवंडी येथे झाला. गुरू नानक यांची शिकवण गुरु ग्रंथसाहिबमध्ये समाविष्ट आहे. गुरू नानक साहिब यांचा जन्म 1469 मध्ये दिल्ली सल्तनतच्या लाहोर जिल्ह्यात, राय भोई की तलवंडी, पंजाब (आता पाकिस्तानमध्ये) गावात एका हिंदू कुटुंबात झाला.
तृप्ता देवी आणि कालुराम मेहता जी खत्री, ज्यांना कालुरानचंद दास बेदी ओळखली जाते, हे त्यांचे पालक होते. नानकी ही त्याची बहीण होती. सोमवार, 27 नोव्हेंबर, 2023 रोजी गुरु नानक देव यांची 554 वी जयंती साजरी होणार आहे. गुरु नानक जयंती निमित्त WhatsApp Status, Facebook Messages द्वारा खास शुभेच्छापत्रक शेअर करण्यासाठी तुम्ही खालील ईमेज मोफत डाऊनलोड करू शकता.
शिख धर्माचे संस्थापक आणि प्रथम गुरु,
गुरु नानक देव यांच्या जयंतीदिनी त्यांना विनम्र अभिवादन….
तमाम शिख बंधु-भगिनींना
गुरुनानक जयंतीच्या शुभेच्छा!

एकता, श्रद्धा आणि प्रेमाचा संदेश देणारे
शीख धर्माचे संस्थापक
गुरू नानक यांच्या जयंतीच्या मन:पूर्वक शुभेच्छा

जगातील सर्व मानव समान आहेत
असा संदेश देणारे शीख धर्माचे संस्थापक
गुरु नानक यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा!

हे जग जिंकायचे असेल, तर स्वतःच्या कमतरतेवर,
दुर्गुणांवर मात करणे अत्यंत आवश्यक आहे.
असा ज्ञान देणारे शीख बांधवांचे आद्य गुरु,
गुरु नानक जयंती निमित्त शुभेच्छा !

सर्व शीख बांधवांना
गुरु नानक जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

शीख धर्मामध्ये गुरु नानक यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. हा दिवस शीख धर्मातील सर्वात पवित्र दिवसांपैकी एक आहे. गुरु नानक यांचा जन्मदिवस गुरुपूरब म्हणूनही ओळखला जातो.