छत्रपती संभाजी हे देखील पिता छत्रपती शिवाजींप्रमाणेच शौर्याचे आणि साहस चे प्रतीक होते. लहानपणापासूनच छत्रपती शिवाजी महाराजांसोबत युद्धभूमीवर राहून छत्रपती संभाजी युद्धकलेत तसेच मुत्सद्देगिरीत पारंगत झाले होते. यामुळेच छत्रपती संभाजीं महाराजांनी मुघल सम्राट औरंगजेबासोबत सुमारे 120 युद्धे केली आणि प्रत्येक युद्धात औरंगजेबाला पराभवाला सामोरे जावे लागले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर 16 जानेवारीला या दिवशी छत्रपती संभाजींमहाराजांचा राज्याभिषेक झाला.शिवरायांचे स्वराज्याचे स्वप्न पूर्णत्वास नेण्यासाठी संभाजीराजे महाराजांच्या मृत्यूनंतर 9 महिन्यांनी छत्रपतीच्या गादीवर विराजमान झाले होते. रायगडावर संभाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला होता. आज यानिमित्त आपण छत्रपती संभाजीराजे यांना आदरपूर्वक नमन करण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी छत्रपती संभाजीं महाराजांचा राज्याभिषेक दिनानिमित्त काही डिजीटल शुभेच्छा घेवून आलो आहोत.
1.मराठा राजा महाराष्ट्राचा,
म्हणती सारे माझा माझा,
आजही गौरव गिते गाती,
ओवाळूनी पंचारती
तो फक्त “राजा संभाजी महाराज!"
स्वराज्याचे धाकले धनी
अजिंक्य मराठा योद्धा
महापराक्रमी
क्षत्रियकुलावतांस
सिंहासनाधीश्वर
शिवपुत्र
महासम्राट छत्रपती संभाजी महाराज!
5.जगणारे ते मावळे होते
जगवणारा तो महाराष्ट्र होता
पण स्व:च्या कुटुंबाला विसरून
जनतेकडे मायेने हात फिरवणारा.
तो 'आपला संभाजी' होता!