![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2022/03/5-Sambhaji-Maharaj-Punyatithi-380x214.jpg)
[Poll ID="null" title="undefined"]अचाट धैर्य, अजोड पराक्रम, असमान्य शौर्य, अनेक भाषांवर प्रभुत्व, संस्कृत पंडित, धर्माभिमानी, व्यासंगी, स्वराज्यरक्षक अशी अनेक बिरुदे लाभलेले धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) यांची आज पुण्यतिथी (Sambhaji Maharaj Punyatithi 2022). 14 मे 1657 रोजी सईबाईंच्या पोटी जन्म घेतलेल्या शंभूराजांचे 11 मार्च, 1689 रोजी वयाच्या 31 व्या वर्षी निधन झाले. हिंदवी स्वराज आणि हिंदु पातशाहीची वैभवशाली प्रतिष्ठापना करणारे, छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांचे जीवन एका ओळीत मांडायचे म्हटले तर, ‘महा पराक्रमी परम प्रतापी, एकच होता माझा शंभू राजा’, ही ओळ समर्पक ठरेल.
लहानपणीच आईचे छत्र हरवल्याने संभाजी महाराज यांचा सांभाळ राजमाता जिजाऊ यांनी केला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर संभाजी महाराज यांनी 9 वर्षे राज्य केले. 16 जानेवारी इ.स. 1681 रोजी संभाजीराजांचा रायगड किल्यावर पूर्णतः राज्याभिषेक झाला. संभाजी महाराजांनी 120 पैकी एकही लढाई हारली नाही. संभाजी महाराज असे एकमेव योद्धा होते ज्यांनी असा इतिहास घडवला होता.
पुढे शत्रुच्या तावडीत सापडल्यानंतर अनेक हालअपेष्टा झेलूनही त्यांनी शरणागती पत्करली नाही. त्यांचे हे शौर्य अजरामर झाले. म्हणून त्यांच्या पुण्यतिथीचा दिवस बलिदान दिन म्हणूनही साजरा केला जातो. अत्यंत शूर, पराक्रमी अशा शंभूराजेंच्या पुण्यतिथी निमित्त खास मराठी Messages, Whatsapp Status, Images शेअर करून त्यांच्या स्मृतीस करा अभिवादन.
![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2022/03/5-Sambhaji-Maharaj-Punyatithi.jpg)
![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2022/03/Sambhaji-Maharaj-Punya-Tithi-2020-5.jpg)
![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2022/03/Sambhaji-Maharaj-Punya-Tithi-2020-4.jpg)
![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2022/03/Sambhaji-Maharaj-Punyatithi_1.jpg)
![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2022/03/Sambhaji-Maharaj-Punyatithi_4.jpg)
![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2022/03/Sambhaji-Maharaj-Punyatithi_2.jpg)
![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2022/03/Sambhaji-Maharaj-Punyatithi_3.jpg)
![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2022/03/Sambhaji-Maharaj-Punyatithi_5.jpg)
दरम्यान, छत्रपती शिवाजी महाजांनंतर संभाजी महाराजांनी स्वराज्याची धुरा अत्यंत समर्थपणे सांभाळली. स्वराज्य विस्तारण्यासाठी ते नेहमी प्रयत्नशील राहिले. संभाजी राजांचा पराक्रम पाहून दिल्लीच्या बादशहा औरंगजेबाने छत्रपती संभाजी यांना पकडल्याशिवाय आपला मुकुट डोक्यावर ठेवणार नाही, असा पण केला होता. औरंजेबाने संघमेश्वरावर येथे शंभूराजांना बंदिवान केले व 11 मार्च, 1689 रोजी त्यांचा मृत्यू झाला.