Sambhaji Maharaj Punyatithi 2021: छत्रपती शिवाजी महाराजांचे सुपुत्र संभाजी राजे महाराज यांची आज पुण्यतिथी आहे. शेर शिवा का छावा, धर्मवीर, अनेक भाषांवर प्रभुत्व, संस्कृत पंडित, धर्माभिमानी, व्यासंगी, शूरवीर अशी अनेक बिरुदे देऊनही ज्यांची कीर्ती वर्णन करताना शब्द अपुरे पडतील, असे छत्रपती संभाजी महाराज. संभाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. मात्र, यावर्षी कोरोनाचे संकट असल्यामुळे संभाजी महाराज यांची जयंती लॉकडाऊनच्या निर्बंधाखाली आणि अत्यंत साध्या पद्धतीने साजरी करावी लागणार आहे.
अत्यंत शूर, पराक्रमी अशा महाराष्ट्राच्या राजाच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. संभाजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त खास मराठी मॅसेज, व्हॉट्सअॅप स्टेटस, एचडी इमेजच्या माध्यमातून शेअर करुन त्यांच्या आठवणींना उजाळा देऊया. हे देखील वाचा- Sambhaji Maharaj Punyatithi 2021 Messages: छत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथी निमित्त Images, WhatsApp द्वारे शंभुराजांच्या स्मृतीस करा अभिवादन!
संभाजी महाराज यांची पुण्यतिथी-
संभाजी महाराज यांची पुण्यतिथी-
संभाजी महाराज यांची पुण्यतिथी-
संभाजी महाराज यांची पुण्यतिथी-
शिवाजी महाराज यांचे मोठे सुपुत्र संभाजी महाराज यांचा जन्म 14 मे 1657 रोजी झाला होता. त्यांच्या आईचे नाव सईबाई होते. संभाजी राजे केवळ 2 वर्षांचे असताना सईबाईंचा मृत्यू झाला होता. त्यामुळे संभाजी राजे यांचे पालन पोषण त्यांच्या आजी जीजाऊंनी केले. संभाजी महाराज हे स्वतः शुर योद्धा आणि उत्तम राजा होते. असे म्हटले जाते की, संभाजी महाराजांनी 150 पेक्षा अधिक युद्ध लढले असून त्यापैकी एकामध्ये देखील त्यांना शरणागती पत्करावी लागली नाही. संभाजी महाराजांनी स्वराज्यासाठी दिलेल्या बलिदानाने त्यांचे श्रेष्ठत्व सिद्ध होते.