Safe April Fools' Day Pranks: 1 एप्रिल हा दिवस दिवस तुमच्या जवळच्या व्यक्तींची मज्जा करण्याचा, त्यांची फिरकी घेण्याचा हक्काचा दिवस आहे. घरच्या घरी किंवा ऑफिसमध्ये या दिवशी तुम्ही जवळच्या लोकांची थोडी मस्करी नक्कीच करू शकता. पण या मस्करीची कुस्करी होणार नाही किंवा हा प्रकार कुणाच्या जीवावर बेतणार अशी मस्करी असू द्या. जगात 1 एप्रिल दिवशी वेगवेगळं सेलिब्रेशन असतं पण सगळीकडे एक गोष्ट समान असते ती म्हणजे एप्रिल फूल्स डे प्रॅन्क (April Fools Pranks) ! मग तुम्ही देखील अशीच काही मस्करी प्लॅन करत असाल तर ही काही सेफ एप्रिल फूल्स डे प्रॅन्क बद्दल नक्की विचार करा. फक्त प्रँक नाही तर एप्रिल फूल सेलिब्रेट करण्यामागील 'हे' आहे खरं कारण!
एप्रिल फूल्स डे
१. ओरिओ बिस्कीट मध्ये क्रीम ऐवजी टूथपेस्ट
तुमच्या ज्यांच्यावर प्रॅन्क करणार आहात ती व्यक्ती 'ओरिओ' बिस्किट्सची वेडी असेल तर आजच्या दिवशी दोन बिस्कीटमधील क्रीम काढा आणि त्यावर टूथपेस्ट लावून ठेवून द्या.
२. खाऊच्या डब्ब्यात भाज्या
डोनट्स किंवा आवडीच्या फुड ब्रँड बॉक्समध्ये त्या वस्तूऐवजी कच्च्या भाज्या भरून त्यांच्या टेबलवर ठेवा.
३. आवडी वस्तू रबरबँड मध्ये गुंडाळा .
अनेकांना फोन किंवा रिमोटशिवाय राहवत नाही. अशावेळेस त्या वस्तूवर रबरबँड बांधून वस्तू अशी बनवा की ती जवळ असूनपण त्यांना ओळखता येणार नाही.
४. ट्रेजर हंट
प्रॅन्क ज्या व्यक्ती वर करणार आहात त्या व्यक्तीच्या अगदी जीवाभावाची वस्तू लपवा आणि ती हवी असेल तर कुठे सापडेल यासाठी चिठ्ठ्या / क्लु कार्ड्स बनवा. तुम्हाला त्या व्यक्तीला जितकं छळायचं आहे तितकी कार्ड्स बनवू शकता आणि त्याहून जास्त मज्जा ती वस्तू जिथून शोधायला सुरुवात केली तिथेच त्यांना पुन्हा आणा.
५. ड्रॉव्हर्सची अदलाबदल
अपेक्षेप्रमाणे जिथे एखादी वस्तू सापडेल किंवा रोज असते तिथे काही तरी भलतेच ठेवा.
६. फेक फोटो
तुमच्या जवळच्या मित्र मैत्रिणींना 'जलस' फील करायचं असेल तर फेक हॉलीडेचा फोटो अपलोड करा.
७. समोरची व्यक्ती असूनही नसल्याचं भासावा
एखाद्या व्यक्तीला समोर असूनही ती नसल्याचं भासवा. तिच्याबद्दल चांगलं वाईट बोला. तिच्या रिऍक्शनवर प्रतिक्रिया देणं टाळा. तिचा आवाज ऐकू येतोय पण दिसत नाही असं काही करा. यामध्ये तुम्हांला स्वतःवरच खूप कंट्रोल ठेवावा लागणार आहे. April Fools' Day 2019: यंदा हमखास आणि सुरक्षितपणे April Fool करायला मदत करतील ही 8 खास Apps
जर तुमच्यावर प्रॅन्क होतोय असं तुम्हांला वाटत असेल तर समोरच्या व्यक्तीला अशी रिऍक्शन द्या की आज 31 मार्च किंवा 2 एप्रिल आहे. म्हणजे तुमचा हिशोब तिथल्या तिथेच संपून जाईल.