April Fools' Day 2019: फक्त प्रँक नाही तर एप्रिल फूल सेलिब्रेट करण्यामागील 'हे' आहे खरं कारण!
April Fools Day 2019 (Photo Credits: File Image)

मार्च महिना संपत आला आहे आणि काही दिवसांतच एप्रिल महिन्याचे आगमन होईल. मग 1 एप्रिलला आपल्यापैकी अनेकजण इतरांना एप्रिल फूल करण्यासाठी विविध युक्त्या लढवतील. प्रँक करतील. आपल्यापैकी अनेकजण एप्रिल फूल बनले असतील आणि अनेकांना एप्रिल फूल देखील केले असेल.

लहानपणापासून 1 एप्रिलला मित्र-मैत्रिणींना खोटं सांगून शेंडी लावण्याची ही परंपरा तुम्ही आम्ही सर्वांनीच अनुभवली आहे. पण ही संकल्पना नेमकी आली कुठून, कशी? माहित आहे? चला तर मग जाणून घेऊया एप्रिल फूल नेमका का साजरा केला जातो...

एप्रिल फूलची संकल्पना आपल्याकडे अमेरिकेतून आली आहे. एप्रिल फूल या दिवसामागची कथा काहीशी गंमतीशीर आहे. जोक आणि प्रँकशी जोडलेल्या या दिवसाला स्पष्ट असा काही इतिहास नाही. पण या दिवसाबद्दलच्या काही वेगवेगळ्या गोष्टी मात्र समोर आल्या आहेत. त्यापैकी एक गोष्ट या 1582 पासून सुरु झाली आहे.

'एप्रिल फूल' मराठी मेसेज

अशी सुरु झाली एप्रिल फूलची परंपरा:

पोप ग्रेगरी XIII ने 1 जानेवारीला नवीन वर्ष म्हणून घोषित केल्यानंतर ग्रेगोरियन कॅलेंडरची सुरुवात झाली. मात्र काही अशी लोक होती जे हे नवे कलेंडर फॉलो करत नव्हती. ते नवीन वर्षाचे सेलिब्रेशन मार्चच्या शेवटच्या आठवडा ते 1 एप्रिल दरम्यान करत होते. असे लोक जोक, प्रँक्स आणि हास्याला बळी पडले आणि तेव्हापासून एप्रिल फूलची ही परंपरा सुरु झाली.

एप्रिल फूल संबंधित इतर गोष्टी:

तर काही थेअरीज सांगतात की, या दिवसाचा पहिला उल्लेख ज्योफ्री चॉसरच्या 'द कॅंटरबरी टेल्स' मध्ये केला होता.

तर काही ठिकाणी हा दिवस ग्रीक-रोमन उत्सव हिलेरियाशी फेस्टीव्हलशी देखील संबंधित असल्याचा उल्लेख आहे. त्यामुळे हा दिवस प्राचीन ग्रीक देवता सिबले यांच्या सन्मानार्थ साजरा केला जातो. त्यात मास्करेड (masquerades, परेड (parades) आणि विनोदांचा (jokes) समावेश होता.

एप्रिल फुल या दिवसाची पुष्टी करणारी ठराविक अशी काही गोष्ट, कथा नसली तरी हा दिवस विनोद, हास्य, प्रँक यासाठी ओळखला जातो.