![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2021/05/kheer-380x214.jpg)
रमजानचा पाक महिना सुरू संपत आला आहे . इस्लामिक कॅलेंडरनुसार रमजान हा नववा महिना आहे. हा एक अतिशय पवित्र महिना मानला जातो. महिनाभर चालणार्या या उत्सवात मुस्लिम संपूर्ण महिनाभर उपवास करतात.सहारीमध्ये लोक दीर्घकाळ टिकणारे पदार्थ खात असतात ज्यात खजूर, फळे, गोड सिंदूर आणि दुधाचे सेवन केले जाते.इस्लामिक कॅलेंडर नुसार ईद-उल-फितर रमजानच्या अरबी महिन्यानंतर शव्वाल महिन्याच्या पहिल्या तारखेला साजरा केला जातो. ईदच्या दिवशी सकाळची प्रार्थना सुरू होते. ईदच्या नमाजात हजारो मुस्लिम जमतात आणि नमाज अदा करतात. (Eid Al-Fitr 2021 Mehndi Designs: ईद-उल-फितर च्या खास दिवशी काढा 'या' सोप्या आणि आकर्षक मेहंदी डिझाइन )
या दिवशी गोड शेवय्यांसह अन्य पदार्थ बनवले जातात. यासाठीच त्याला 'मीठी ईद' असे सुद्धा म्हटले जाते.या दिवशी गोड डिश मध्ये एक खास डिश आवर्जून बनवली जाते ती म्हणजे शीरखुरमा. या डिश शिवाय मुसलमान नागरिकांची ईद साजरीच होऊ शकत नाही. तुम्हालाही यंदा वेगळ्या प्रकार शीर खुरमा ही डिश ट्राय करायची असेल तर आज आम्ही तुमच्यासाठी काही खास रेसिपी घेऊन आलो आहोत. जय तुम्ही यंदा नक्की ट्राय करू शकता.
ट्रेडिशनल शीर खुरमा रेसिपी
बोहरी स्टाईल शीर खुरमा
हैद्राबादी शाही शीर खुरमा
दिल्ली स्पेशल शीर खुरमा
शुगर फ्री शीर खुरमा
ईदचा सण नेहमीच चंद्रावर अवलंबून असतो. हा उत्सव चंद्र पाहिल्यानंतरच साजरा केला जातो. 12 मे रोजी रात्री चंद्र दिसला तर ईदचा सण 13 मे रोजी साजरा केला जाईल. 13 मे रोजी चंद्र दिसला तर ईद 14 मे रोजी साजरी होईल. तेव्हा यंदा नेहमीच्या त्याच प्रकारचा शीर खुरमा करुन कंटाळला असाल तर यंदा या वेगळ्या रेसिपीज नक्की ट्राय करा आणि घरच्यांना ही खुश करा.