Eid Al-Fitr 2021 Mehndi Designs: ईद-उल-फितर च्या खास दिवशी काढा 'या' सोप्या आणि आकर्षक  मेहंदी डिझाइन 
Photo Credit: YouTube & Instagram

रमजान महिन्यात इस्लामिक धर्माचा महिना सुरू आहे. या महिन्यात जगभरातील मुस्लिम उपवास करीत असतात आणि अधिकाधिक वेळ अल्लाहच्या उपासनेत घालवतात. या संपूर्ण महिन्यासाठी उपवास ठेवण्या व्यतिरिक्त, मुस्लिम शिस्तबद्ध जीवन जगतात आणि शक्य तितके चांगले कार्य करतात.असे म्हटले जाते की रमजान महिन्यात अल्लाह त्याच्या बांधवांसाठी जन्नतचे दरवाजे उघडतो आणि रोजेदारांचा प्रत्येक आशीर्वाद स्वीकारतो. जेव्हा ईदचा चंद्र सुमारे 29 किंवा 30 दिवसांनंतर दिसतो, तेव्हा शव्वाल च्या पहिल्या तारखेला ईद अल-फितर (Meethi Eid) साजरी केली जातो. या दिवशी मुस्लिम समाजातील लोक सकाळी मशिदींमध्ये जमतात आणि नमाज अर्पण करतात आणि एकमेकांना ईदच्या शुभेच्छा देतात. महिला या दिवशी पारंपारिक वेषभूषा करतात आणि त्यांच्या हातात आणि पायात मेहंदी बनवतात.यंदा ची ईद ही दिवसांवर आली आहे तेव्हा तुमचासाठी घेऊन आलो आहोत काही खास सोप्या आकर्षक मेहंदी डिझाईन जय यंदा ट्राय करू शकता. (When is Ramzan Eid 2021: यंदा रमजान ईद कधी? जाणून घ्या त्याचे महत्व )

फ्लोरल अरेबिक मेहंदी डिझाइन

ईद स्पेशल मेहंदी डिझाइन 

टिक्की मेहंदी डिझाइन 

स्टाइलिश ईद मेहंदी डिझाइन 

स्टाइलिश अरेबिक मेहंदी डिझाइन 

लेटेस्ट मेहंदी डिझाइन 

ईद-उल-फितर जगभरातील मुसलमान लोक धूमधडाक्यात साजरे करतात, यालाच मीठी ईद देखील म्हणतात. या दिवशी मुस्लिम समाजातील लोक एकमेकांना मिठी मारतात आणि ईद मुबारक म्हणतात. कुटुंबातील सदस्य, नातेवाईक आणि मित्रांसह मेजवानी आयोजित केली जाते. मात्र यावर्षी कोरोना विषाणूच्या साथीच्या दुसर्‍या लाटे मुळे यंदा ईदचा सण मुस्लिम बंधवांना त्यांच्या घरी राहूनच साजरा करावा लागणार आहे.