
रमजान (Ramadan) हा इस्लामिक पंचांगातील नववा महिना आहे आणि तो मुस्लिमांसाठी सर्वात पवित्र मानला जातो. या काळात, मुस्लिम सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत उपवास करतात. रमजानमध्ये उपवास ठेवणे इस्लामच्या पाच स्तंभांपैकी एक मानले जाते. आता जगभरात रमजानच्या महिन्याचे वेध लागले आहेत. इस्लामिक कॅलेंडरनुसार, रमजान महिना चंद्र दिसण्यावर अवलंबून असतो. 2025 मध्ये, रमजानचा पवित्र महिना 28 फेब्रुवारी 2025 रोजी सुरू होऊ शकतो. मात्र दरवर्षीप्रमाणे यावेळीही रमजानच्या तारखेबद्दल लोकांमध्ये संभ्रम आहे, रमजानचा पहिला उपवास 1 मार्च असेल की, 2 मार्चला. चंद्रदर्शन झाल्यानंतर रमजान महिना सुरू होतो आणि चंद्रदर्शन झाल्यानंतरच ईद-उल-फित्रचा सण साजरा केला जातो.
जाणून घ्या का खास आहे रमजान महिना-
असे मानले जाते की या महिन्यातच पैगंबर मुहम्मद यांना प्रथम कुराणाचा प्रकाश मिळाला होता. रमजानमध्ये उपवास (रोजा) ठेवणे इस्लामच्या पाच स्तंभांपैकी एक आहे, आणि हा आत्मशुद्धी, संयम आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी महत्त्वाचा मार्ग मानला जातो. हा प्रार्थना, दानधर्म आणि सत्कर्म करण्याचा काळ असतो. रमजान महिन्यात मुस्लिम समुदायाचे लोक उपवास ठेवतात आणि अल्लाहची पूजा करतात. सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत उपवास असतो. या काळात सेहरीच्या वेळेपासून ते इफ्तारपर्यंत काहीही खाल्ले जात नाही.
रमजानमध्ये पाच वेळेच्या नमाजांव्यतिरिक्त, आणखी एक विशेष प्रकारची नमाज अदा केली जाते ज्याला तरावीह नमाज म्हणतात. कोणत्याही मुस्लिम व्यक्तीला तरावीह नमाज अदा करणे बंधनकारक नाही, परंतु ते अदा केल्याबद्दल खूप मोठा फायदा मिळतो. रमजान महिन्यात जकात देणे देखील महत्त्वाचे आहे. (हेही वाचा: Nashik Kumbh Mela 2027 Dates: प्रयागराज महाकुंभानंतर नाशिक येथे 2027 मध्ये होणार पुढील कुंभमेळा; महाराष्ट्र सरकारने सुरु केली तयारी, जाणून घ्या तारखा)
जाणून घ्या कधी असेल रमजान शरीफचा पहिला उपवास-
भारतात रमजान महिना कधी सुरू होईल, हे सौदी अरेबिया म्हणजेच मक्का येथे चंद्र दिसण्यावर अवलंबून आहे. सौदी अरेबियामध्ये चंद्र दिसल्यानंतर दुसऱ्या दिवशी भारतात पहिला उपवास पाळला जातो. त्याच वेळी, असे मानले जाते की यावर्षी चार का दीदार 28 फेब्रुवारी रोजी होईल, त्यानंतर 1 मार्चपासून रमजान महिना सुरू होईल. जर भारतात 28 फेब्रुवारी रोजी रमजानचा चंद्र दिसला तर पहिला उपवास 1 मार्च रोजी असेल, आणि जर चंद्र 1 मार्चला दिसला तर पहिला उपवास 2 मार्च रोजी असेल.