
इस्लाम धर्मातील सर्वात पवित्र मानला जाणारा महिना रमजान (Ramadan) सध्या सुरु आहे. रमजान महिन्यात मुस्लिम बांधव उपवास किंवा रोजे ठेवतात आणि अल्लाहची मोठ्या भक्तीने प्रार्थना करतात. रमजानच्या संपूर्ण महिन्यात, म्हणजेच चंद्राच्या तारखेनुसार 29 किंवा 30 दिवस रोजे ठेवले जातात. रमजानचा सकाळचा चंद्र पाहिल्यानंतर सेहरी (Sehri) केली जाते व सूर्यास्तानंतर इफ्तार (Iftar), म्हणजेच उपवास सोडला जातो. जे लोक उपवास ठेवतात ते सेहरी आणि इफ्तार दरम्यान काहीही खाऊ किंवा पिऊ शकत नाहीत. रमजानच्या महिन्यात अल्लाहचे पवित्र ‘कुराण शरीफ’ जमिनीवर उतरले होते, म्हणूनच रमजान महिन्यात मुस्लिम बांधव आपला बराच वेळ नमाज आणि कुराणचे पठन करण्यात व्यतीत करतात.
रमजानच्या महिन्यात मशिदींमध्ये एक खास नमाज, तरावीह पठण केले जाते. मात्र यावेळी कोरोना विषाणूमुळे मशिदींमध्ये एकत्र नमाजचे पठण करण्यावर बंदी घातली आहे. अशावेळी लोक घरातच सेहरी आणि इफ्तारवेळी एकत्र नमाजचे पठण करीत आहे. तर चला जाणून घेऊया या पवित्र महिन्याच्या काळात राज्यातील महत्वाच्या शहरांमधील, उद्या, 22 मेच्या सेहरी आणि इफ्तारच्या वेळा-
> मुंबई -
सेहरी वेळ - 04:41
इफ्तार वेळ - 19:09
> पुणे -
सेहरी वेळ - 04:38
इफ्तार वेळ - 19:08
> कोल्हापूर -
सेहरी वेळ - 04:41
इफ्तार वेळ - 19:03
> औरंगाबाद -
सेहरी वेळ - 04:29
इफ्तार वेळ - 19:04
> नागपूर -
सेहरी वेळ - 04:11
इफ्तार वेळ - 18:50
> नाशिक -
सेहरी वेळ - 04:35
इफ्तार वेळ - 19:11
(हेही वाचा: Health Tips: शरीरात हिमोग्लोबिन वाढविण्यासाठी आहारात असावा 'या' अन्नपदार्थांचा समावेश)
दरम्यान, इस्लाम धर्माची मान्यता आहे की, रमजानच्या महिन्यात स्वर्गाचे दरवाजे उघडले जातात आणि नरकाचे दरवाजे बंद होतात. या महिन्यात अल्लाह, प्रार्थना करणाऱ्या आणि उपवास ठेवणाऱ्या व्यक्तीला आशीर्वाद देतो. रमझान संपल्यावर येणाऱ्या बीजेच्या दिवशी ईद-उल-फ़ित्र ऊर्फ रमझान ईद साजरी होते.