Ramzan 2019 Sehri & Iftar Timing: रमजान (Ramzan) हा मुस्लिम बांधवांसाठी पवित्र महिना आहे. या महिन्यात चंद्रोदयापासून संध्याकाळी चंद्रास्तापर्यंत काहीही न खाता - पिता रोजे म्हणजेच उपवास ठेवले जातात. सकाळी सेहरीच्या (Sehri) वेळेपर्यंत आणि संध्याकाळी इफ्तारच्या (Iftar) वेळानंतर रोजा खजूर आणि पाणी पिऊन संपवला जातो. यंदा 7 मे ते 4 जून 2019 या काळात रोजा ठेवले जाणार आहेत. सेहरी हा शब्द सेहर हा शब्दापासून निर्माण झाला आहे. त्याचा अर्थ सकाळ असा होतो. Ramadan 2019: जाणून घ्या 'रमजान' महिन्याचे महत्व
महराष्ट्रामध्येही अनेक मुसलमान बांधव या रमजान महिन्यात रोझा ठेवणार आहेत. कामाच्या, ऑफिस, शाळा, कॉलेजच्या वेळा सांभाळत अनेकांना या इफ्तार आणि सेहरीच्या वेळा सांभाळायच्या असतात. म्हणूनच मुंबई, पुणे, रत्नागिरी आणि औरंगाबाद या प्रमुख शहरांमधील सेहरी आणि इफ्तारच्या वेळा पहा
7 मे 2019 च्या मुंबई, पुणे, रत्नागिरी आणि औरंगाबाद शहरातील सेहरी आणि इफ्तारची वेळ
मुंबई सेहरी वेळ- सकाळी 04:49
मुंबई इफ्तार वेळ - संध्याकाळी 7:04
पुणे सेहरी वेळ - सकाळी 04:46
पुणे इफ्तार वेळ - संध्याकाळी 6:59
रत्नागिरी सेहरी वेळ- सकाळी 04:51
रत्नागिरी इफ्तार वेळ - संध्याकाळी 6:59
औरंगाबाद सेहरी वेळ- सकाळी 04:37
औरंगाबाद इफ्तार वेळ- संध्याकाळी 6:55
रोजे हा केवळ उपवासाचा एक भाग नाही. यामध्ये वाईट गोष्टींपासून दूर राहण्याचा, स्वतःच्या दुर्गुणांवर मात करण्याची एक संधी असते. यामध्ये खोटं बोलण्यापासून इतरांबद्दल वाईट विचार करणं, दुसर्याची बदनामी करणं अशा किमान 5 गोष्टी ंचा समावेश आहे.