Raksha Bandhan 2021 HD Images: रक्षाबंधन निमित्त शुभेच्छांसाठी  Messages, WhatsApp Status, Quotes इथे करता येऊ शकतील डाऊनलोड
Raksha Bandhan 2021 | File Image

हिंदू पंचागाप्रमाणे श्रावण महिन्यात येणारा राखी पौर्णिमा (Rakhi Purnima) हा सण नारळी पौर्णिमेच्या (Narali Purnima) दिवशी येतो. काही वेळा पौर्णिमा एकापाठोपाठ एक अशी दोन दिवस येते. अशा वेळी दुसऱ्या दिवशी येणाऱ्या पौर्णिमेला रक्षाबंधन (Raksha Bandhan) सण साजरा होतो. बहिण आणि भावाच्या उत्कट प्रेमाचा, स्नेहाचा सण म्हणजे रक्षाबंधन (Raksha Bandhan 2021). हिंदू धर्मशास्त्रात म्हटले आहे की, श्रावण पौर्णिमेस बहिणीने भावाला राखी (Rakhi ) बांधावी. रक्षाबंधनाच्या विधीस काही लोक 'पवित्रारोपण' असेही म्हणतात. आपल्या भावाचे कल्याण व्हावे. त्याला दीर्घायू लाभावे तसेच त्याने आपले रक्षण करावे अशी या सणापाठीमागची भावना आहे. या दिवशी एकमेकांना शुभेच्छाही दिल्या जातात. इथे आम्ही रक्षाबंधन निमित्त HD Wallpapers, Messages, WhatsApp Status, Quotes देत आहोत. ज्याद्वारे आपणही एकमेकांना देऊ शकता रक्षाबंधनाच्या शुभेच्छा.

देशातील वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये रक्षाबंधन वेगवेगळ्या पद्धतीने साजरे होते. सर्वसामान्यपणे रक्षाबंधनाच्या दिवशी बहीण आपल्या भावाच्या हातावर राखी बांधते. मात्र, काही प्रदेशांमध्ये मुलगी आपल्या वडीलांना, पत्नी आपल्या पतीला तर काही प्रांतात नोकर आपल्या मालकाला राखी बांधतात. सुरुवातीच्या काळात रक्षाबंधनाचा अर्थ असा सांगितला जायचा की, आपल्यापेक्षा बलवान, सामर्थ्यवान व्यक्तीस राखी बांधावी. तसेच त्याच्याकडून आपल्या संरक्षणाचे वचन घ्यावे. या दिवशी बहिण आपल्या सख्खा भावाच्या हातावर राखी बांधतेच. परंतू, त्यासोबतच बंधुसमान असलेल्या व्यक्तीच्या हातावरही राखी बांधली जाते.

रक्षाबंधनाच्या शुभेच्छा!

Raksha Bandhan 2021 | File Image
Raksha Bandhan 2021 | File Image
Raksha Bandhan 2021 | File Image
Raksha Bandhan 2021 | File Image
Raksha Bandhan 2021 | File Image

दरम्यान, यंदाच्या वर्षी रक्षाबंधन सणावर कोरोनाचे सावट आहे. त्यामुळे रक्षाबंधन सण साजरा करताना कोरोना नियम आणि निर्बंधांचे पालन करावे लागणार आहे. जेणेकरुन कोरोना संक्रमनाचा धोका टळेल. त्यासाठी कौटुंबीक गर्दी टाळणे, बहिण भावांनी राखी बांधताना अंतर ठेवणे. मास्क, सॅनिटायजर वापरणे. प्रवास शक्यतो टाळणे, वैगेरे गोष्टींची खबरदारी घ्यावी लागणार आहे.