Raksha Bandhan 2020 Muhurat Time: भद्र काळात राखी बांधणं का टाळलं जातं? जाणून घ्या रक्षाबंधनाचा भद्र, राहू काळ कोणता आणि शुभ मुहूर्त काय?
Raksha Bandhan | Photo Credits: Pixabay.com

Raksha Bandhan Bhadra Kal Time : रक्षाबंधन (Raksha Bandhan)  हा सण श्रावण पौर्णिमा (Shravan Pournima)  दिवशी साजरा केला जातो. भारतभर मोठ्या उत्साहाने साजरा केल्या जाणार्‍या या सणाला बहीण भावाच्या मनगटावर राखी बांधून त्याचे औक्षण करते. त्याच्या बदल्यामध्ये भावाकडून तिचे कायम रक्षण केले जाईल असे वचन घेते. भारतीय संस्कृतीमध्ये महत्त्वाच्या सणावारात मुहूर्त बघितले जातात. राखीपौर्णिमा (Rakhi Pournima) देखील मुहूर्त पाहून करण्याची अनेक ठिकाणी पद्धत आहे. दरम्यान जसा चांगला काळ हा शुभ मुहूर्त (Shubha Muhurat) असतो तसाच वाईट काळ भद्र काळ (Bhadra Kal) किंवा राहू काळ (Rahu Kal) म्हणून देखील ओळखला जातो. या काळात शुभ कार्य टाळण्याचे संकेत दिले आहे. Happy Raksha Bandhan 2020 Messages: रक्षाबंधनाच्या मराठी शुभेच्छा Wishes, WhatsApp Status च्या माध्यमातून देऊन राखी पौर्णिमेचा आनंद करा द्विगुणित!

पौराणिक कथा, धार्मिक मान्यतांनुसार, भद्र योग आणि काळात राखी बांधली जात नाही. त्यामागे सांगितली जाणारी एक कथा म्हणजे लंकाधीश रावणाने भद्र काळात बहीणीकडू राखी बांधून घेतली आणि पुढील वर्षभरामध्ये त्याचा विनाश झाला. त्यामुळे भद्र योग, राहू काळ वगळून राखी बांधली जाते. Raksha Bandhan Rangoli Designs: रक्षाबंधन सणाच्या निमित्त सहज-सोप्या रांगोळी डिझाईन काढून द्विगुणित करा राखी पौर्णिमा सणाचा आनंद!

रक्षाबंधन 2020 चा भद्र, राहू काळ काय?

यंदा 3 ऑगस्ट दिवशी रक्षाबंधनाचा सण साजरा करताना सकाळी 9.30 पर्यंत भद्र योग आणि राहुकाळ आहे. त्यामुळे राखी पौर्णिमेचा सण त्यानंतर साजरा करणं अधिक हितावह आहे.

रक्षाबंधनाचा शुभ मुहूर्त

दुपारी 2 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत सलग चांगला काळ आहे. त्यामुळे बहीण-भावाच्या सोयीनुसार दुपारी 2 ते 7 या वेळेमध्ये राखी बांधण्यासाठी चांगला काळ आहे.

पहा आनंद पिंपळकर यांनी दिलेली माहिती

दरम्यान सध्य भारतभर कोरोना व्हायरसचं संकट असल्याने आजच्या राखी पौर्णिमेवर देखील त्याचं सावट पहायला मिळणार आहे. यंदा अनेक बहीण-भावांनी व्हर्च्युअल जगात राखी पौर्णिमा साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे. एकमेकांची सुरक्षा सांभाळत आणि पुरेशी खबरदारी घेत राखी पौर्णिमेचा सण साजरा करा आणि आनंद द्विगुणित करा. हॅप्पी रक्षाबंधन!

(टीप: सदर लेख केवळ माहिती देण्याच्या उद्देशाने लिहला आहे. यामधील माहितीची लेटेस्टली मराठी पुष्टी करत नाही. )