Raksha Bandhan 2020: फूड  ते पर्यावरणपूरक यंदा रक्षाबंधनासाठी राखी चे बाजारात उपलब्ध आहेत 'हे' हटके पर्याय!
राखी डिझाईन। (Photo Credits: Twitter, Facebook)

Rakhi Designs 2020:  भावा-बहिणाचा जिव्हाळ्याचा सण म्हणजे रक्षाबंधन. श्रावण महिन्यात पौर्णिमेला राखी पौर्णिमा म्हणजेच नारळी पौर्णिमा दिवशी हा सण साजरा केला जातो. यंदा 3 ऑगस्ट दिवशी राखी पौर्णिमा आहे. त्यामुळे यंदा कोरोना व्हायरस संकटामुळे अनेक भावा-बहिणींना व्हर्च्युअली राखी पौर्णिमेचा सण साजरा करावा लागणार आहे. लांब राहणार्‍या भावांसाठी अनेक बहिणींचा ऑनलाईन राखी शोधण्याचा आणि वेळेत भावाच्या घरापर्यंत ती पोहचती करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. कोरोना संकट असलं तरीही यंदादेखील राख्यांच्या ट्रेंड्समध्ये वैविध्य पहायला मिळत आहे. भावाच्या फोटोसह, नावांसह कस्टमाईज्ड राख्या ते अगदी खवय्या भाऊरायासाठी खाद्यपदार्थांची प्रतिकृती असलेल्या अनेक राख्या बाजारात उपलब्ध आहेत. अनेक ऑनलाईन स्टोअर मध्येही राख्या त्यासोबत पॅकेज असे उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्याची घरपोच सेवा देखील दिली जाणार आहे. त्यामुळे यंदा तुमच्या भावासाठी पहा तुमच्यासाठी कोनकोणत्या राख्यांचे पर्याय उपलब्ध आहेत.

हिंदू धर्माच्या मान्यतांनुसार, भावाने रक्षण करावं या भावनेपोटी बहिण भावाच्या मनगटावर रेशमी धागा बांधते. राखीचं बंधन भावाला त्याच्या कर्तव्याची आठवण करून देणारं असतं. त्याला स्नेह, माया यांचे देखील प्रतिक मानले जाते. मग यंदा हा जिव्हाळा वाढवण्यासाठी तुम्ही काही हटके राखींचे पर्याय शोधत असाल तर पहा बाजारात उपलब्ध असलेल्या राख्या कोणत्या?

फूड राखी

खवय्या भाऊराया असेल तर यंदा त्याच्या आवाडीच्या पदार्थांचे मिनिएचेअर राखी डिझाईनमध्ये रूपांतरित करून त्याची बनवलेली राखी देखील ट्रेंडमध्ये आहे. यामध्ये मॅगी, पाणी पुरी पासून अगदी डोसा, पिझ्झा पर्यंत पर्याय उपलब्ध आहेत.

ऑनलाईन गेम्स वेडे

आजकाल तरूणांमध्ये पबजी, लुडो यासारख्या ऑनलाईन गेम्सची क्रेझ आहे. तुमचा भाऊ देखील त्यापैकी एक असेल तर राख्यांमध्ये आता हे पर्याय देखील यंदा उपलब्ध झाले आहेत.

'कूल ब्रो'

दादा, भाऊ, अण्णा ते ब्रो अशा कूल आणि हटके अंदाजात तुम्ही भावाला हाक मारत असाल तर तेच तुम्ही तुमच्या राखीमध्ये आणू शकता. या अक्षरांच्या अनेक राख्या बाजारात उपलब्ध आहेत.

मल्टीपर्सपस

राखी ही एक दिवस ते पुढील काही महिनाभर भाऊ हातावर ठेवतो. त्यानंतर त्याचं विसर्जन केलं जातं. मात्र आता राखी फेकून देण्यापेक्षा त्याचा राखी पौर्णिमेनंतर वापर करता येणार आहे. यामध्ये बूक मार्क्स, किचेन अशा मध्यामातून त्याचा वापर करता येऊ शकतो अशा राख्या उपलब्ध आहेत.

प्लांटेबल सीड राख्या

सण साजरा करतानादेखील पर्यावरणाचं भान राखायचं असेल प्लांटेबल राख्यादेखील बाजारात आहेत. यामध्ये राखीच्या डिझाईनमध्ये एक बीज असेल. तुमचा राखी पौर्णिमेचा सण झाला की झाडाचं रोप म्हणून बीजारोपण करू शकता.

कस्टमाईज्ड राख्या

रक्षाबंधन निमित्त आता कस्टमाईज्ड फोटो, नाव लिहलेल्या राख्या बाजारात उपलब्ध होऊ शकतात.

दरम्यान रक्षा-बंधन हा सण पारंपारिक पद्धतीने साजरा करणार असाल तर अनेक जण रेशमी धाग्यांच्या केवळ, मोती, रूद्राक्ष किंवा चंदनाचा समावेश असलेल्या राख्यांचादेखील समावेश करू शकतात. मग यंदा भावाची आवड-निवड पाहून तुम्ही परफेक्ट राखी लवकर निवडा आणि ती भावापर्यंत पोहचती करण्यासाठी प्रयत्न करा.