हिंदू धर्मीय पितृपक्षामध्ये (Pitru Paksha) आपल्या पूर्वजांचे स्मरण करून त्यांच्याप्रती आपला आदरभाव व्यक्त करतात. भाद्रपद पौर्णिमेपासून पुढील 15 दिवसांचा हा काळ पितृपक्ष म्हणून ओळखला जातो. या काळात श्राद्ध (Shradha) आणि तर्पण (Tarpan) यांचे विधी केले जातात. हिंदू धर्मीयांच्या श्रद्धेनुसार, या पितृपक्षामध्ये अतृप्त जीव पृथ्वीवर त्यांच्या कुटुंबियांजवळ येतात. अशावेळी पिंडदान करून त्यांना इच्छा पूर्ण करत त्यांना मोक्ष मिळवून देण्याचा प्रयत्न केला जातो. मग यंदा पितृपक्षामध्ये कोणत्या तिथीचं श्राद्ध कोणत्या दिवशी आहे? हे जाणून घेण्यासाठी खालील माहिती नक्की पहा.
दरम्यान पितृपक्षाच्या 15 दिवसांमध्ये नवी किंवा शुभं कामं टाळली जातात. मंगल कार्य देखील या काळात न करण्याकडे हिंदू धर्मीयांचा कल असतो. त्यामुळे यंदा भाद्रपद पौर्णिमा म्हणजेच 20 सप्टेंबर ते सर्वपित्री अमावस्या म्हणजे 6 ऑक्टोबर पर्यंत यंदा पितृपक्ष आहे. (नक्की वाचा: पितृपक्ष श्राद्धाच्या जेवणात काकडी वडे आणि तांदळाची खीर बनवण्यासाठी या झटपट रेसिपीज करतील मदत (Watch Video)).
कोणत्या तिथीचं श्राद्ध कोणत्या दिवशी?
प्रतिपदा श्राद्ध - 21 सप्टेंबर
द्वितीया श्राद्ध - 22 सप्टेंबर
तृतीया श्राद्ध - 23 सप्टेंबर
चतुर्थी श्राद्ध (भरणी श्राद्ध) - 24 सप्टेंबर
पंचमी श्राद्ध - 25 सप्टेंबर
षष्ठी श्राद्ध - 26 सप्टेंबर
सप्तमी श्राद्ध- 28 सप्टेंबर
अष्टमी श्राद्ध - 29 सप्टेंबर
नवमी श्राद्ध - 30 सप्टेंबर
दशमी श्राद्ध - 1 ऑक्टोबर
एकादशी श्राद्ध- 2 ऑक्टोबर
द्वादशी श्राद्ध - 3 ऑक्टोबर
त्रयोदशी श्राद्ध- 4 ऑक्टोबर
चतुर्दशी श्राद्ध - 5 ऑक्टोबर
सर्वपित्री अमावस्या श्राद्ध - 6 ऑक्टोबर
पितृपक्षात पिंडदान करताना कावळ्याला अन्नदान केले जातं. मृत आत्मा कावळ्याच्या रूपाने येतो. जर तो तृप्त असेल तर तो अन्न ग्रहण करतो. अतृप्त आत्मा अन्नाला शिवत नाही असा देखील समज असतो. जन्म, मृत्यू आणि जीवन या फेर्यातून आत्माला सुटका मिळवून देण्यासाठी काही विधी, प्रार्थना करण्याची देखील पद्धत आहे.
टीप: सदर लेख केवळ माहिती देण्याच्या उद्देशाने लिहला आहे. लेटेस्टली मराठी यामधील कोणत्याही गोष्टीची पुष्टी करत नाही.