Lunar eclipse (Photo Credits: Pixabay)

Penumbral Lunar Eclipse of 2020:  नववर्ष 2020 वर्षामधील पहिलं चंद्रग्रहण यंदा 10 जानेवारी दिवशी आहे. हे चंद्रग्रहण छायाकल्प आहे. म्हणजे ज्यावेळी चंद्रबिंब पृथ्वीच्या दाट छायेभोवती असणार्‍या विरळ छायेमध्ये येते त्यावेळी छायाकल्प म्हणजेच मांद्य चंद्रग्रहण दिसते. काही पंचागाकर्त्यांच्या मानन्यानुसार, हे चंद्रग्रहण छायाकल्प असल्याने त्याला ग्रहण म्हणून मानले जात नाही. पण भारतीय जनमानसांमध्ये ग्रहण या भौगोलिक घटनेबद्दलही अनेक समज-गैरसमज आहेत.

ग्रहणाचा आपल्या आरोग्यावर चांगला वाईट कसा होतो याचे काही थेट नियम नाहीत पण पारंपारिक मान्यतांनुसार ग्रहणाचा वाईट परिणाम टाळण्यासाठी काही विशिष्ट गोष्टींची मदत होऊ शकते. यामध्ये ग्रहण काळात दान करणं हे फायदेशीर आहे. त्यामुळे पहा उद्याच्या ग्रहण काळात काय काय दान करणं फायदेशीर आहे. Chandra Grahan 2020: वर्षातील पहिले चंद्रग्रहण 10 जानेवारीला; जाणून घ्या कोणत्या राशीवर कसा पडणार प्रभाव.  

ग्रहण काळात काय दान कराल?

चांदी

ग्रहण काळात चांदी दान करण्याची प्रथा आहे. चांदी दान केल्याने मन मजबूत आणि बुद्धी कुशाग्र होण्यास मदत होते. घरामध्ये संपन्नता, वैभव यावे याकरिता चांदीचे दान फायदेशीर आहे.

तांदूळ

तांदूळ दान केल्याने घरामध्ये अन्नधान्याची कधीच कमतरता निर्माण होत नाही. काही ठिकाणी ग्रहण काळात हवनामध्ये तांदळाचा वापर करणं हे घरातील द्रारिद्र्य दूर करण्यासाठी फयादेशीर आहे.

दूध

चंद्रग्रहण काळात दूध, दही यांचं दान करणं फायदेशीर आहे. दूध, दह्याचा चंद्राशी अनेक प्रकारे धार्मिक, पौराणिक संबंध आहे. ग्रहण काळात दूध दान केल्याने लक्ष्मी-नारायणाचा आशिर्वाद मिळतो.

साखर

इष्ट देवतांचा आशिर्वाद मिळावा या कारणांसाठी साखरेचं दान देखील फायदेशीर समजलं जातं. दरम्यान यासोबतच श्रीसुक्त पठण केल्याने नकारात्मक परिणाम दूर ठेवण्यास मदत होते.

पांढरं फूल

सफेद रंग हे शांतता, शीतलता याचं प्रतिक आहे. त्यामुळे तुमच्या आयुष्यातील वाद-विवाद दूर ठेवण्यासाठी देवाला पांढरं फूल अर्पण करणे देखील फयदेशीर आहे.

पांढरे कपडे

घरामध्ये धनाची बरसात व्हावी याकरिता पांढरे कपडे दान करणं फायदेशीर ठरते.

मोती

चंद्र आणि मोती हे समीकरण देखील खास आहे. मोत्याची शीतलता रहावी म्हणून त्याचा वापर केला जातो. सुख, शांती नांदावी मोत्याचं दान फायदेशीर आहे.

यंदा भारतासह आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, युरोप खंडातून ग्रहण दिसणार आहे. शुक्रवार 10 जानेवारी दिवशी रात्री 10.38 वाजता चंद्रबिंब पृथ्वीच्या विरळ छायेमध्ये येण्यास प्रारंभ होईल. रात्री 12.40 वाजता जास्तीत जास्त म्हणजे 89टक्के चंद्रबिंब पृथ्वीच्या विरळ छायेमध्ये येईल. उत्तररात्री 2.42 वाजता संपूर्ण चंद्रबिंब पृथ्वीच्या विरळ छायेतून बाहेर पडेल.

Chandra Grahan 2020: उद्या वर्षातील पहिले चंद्र ग्रहण; गर्भवती महिलांनी घ्यावी 'ही' खास काळजी Watch Video

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीच्या आधारे लिहिण्यात आलेला आहे. लेटेस्टली मराठी यातुन कोणतीही अंधश्रद्धा पसरवू इच्छित नाही. )