नववर्षातील पहिले चंद्र ग्रहण (Chandra Grahan 2020) 10 जानेवारी रोजी पाहायला मिळणार आहे, विशेष म्हणजे हे ग्रहण भारतातूनही स्पष्ट दिसू शकेल. रात्री 10 वाजून 37 मिनिटांनी सुरु होणाऱ्या या ग्रहणाचा कालावधी 4 तास असून मध्यरात्री 2 वाजून 42 मिनिटांपर्यंत ग्रहणाचा प्रभाव पाहता येईल. भारताशिवाय हे ग्रहण युरोप (Europe), आशिया (Asia) , आफ्रिका (Africa) , ऑस्ट्रेलिया (Australia) याठिकाणहून सुद्धा दिसून येईल. सूर्य आणि चंद्र ग्रहणाचे वैज्ञानिक कारण सांगायचे झाल्यास, पृथ्वी सूर्याची आणि चंद्र पृथ्वीची परिक्रमा करत असतो. ही प्रक्रिया घडत असताना काही वेळा पृथ्वी सूर्य आणि चंद्र यांच्या मध्ये येते. या वेळी पृथ्वीची सावली चंद्रावर पडते आणि चंद्र ग्रहण लागते. यावेळी राशीनुसार काही जणांवर या ग्रहणाचा थेट प्रभाव पडतो तर लांब कक्षेतील ग्रहांनुसार त्या राशींवर कमी प्रभाव दिसतो. यंदाच्या या चंद्रग्रहणात धनु राशी ही प्रभावाच्या बाहेर असेल तर मिथुन ही सर्वाधिक प्रभावित राशी असणार आहे.
Chandra Grahan 2020: जानेवारी महिन्यात या वर्षातील पहिले चंद्र ग्रहण; तारीख, वेळ, कालावधी घ्या जाणून
या राशीनुसार तुम्ही आवश्यक काळजी घेतल्यास ग्रहणाच्या पाठीला पाठ लावून येणारा नकारात्मक प्रभाव टाळता येईल तसेच अधिकाधिक सकारात्मकता देणारा प्रभाव आपल्या आयुष्यात येऊ शकतो, कोणत्या राशींवर कसा प्रभाव पडेल हे आज आपण पाहणार आहोत..
चंद्र ग्रहण 2020 पहा राशी नुसार कसा असेल प्रभाव?
मेष: चंद्र ग्रहणाचा मेष राशीवर संमिश्र प्रभाव असणार आहे. हा दिवस तुमच्यासाठी खास असेल तुमच्या कर्तुत्वाला झालेली देणारा हा दिवस ठरणार आहे मात्र तुमच्या जवळच्या व्यक्तीला तुमच्या वागण्याचा त्रास होत नाहीये याची दक्षता बाळगा.
वृषभ : चंद्र ग्रहण वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी धनलाभाचे संकेत घेऊन येणार आहे. तुमच्या जिभेवर मात्र थोडा संयम ठेवण्याची गरज आहे अन्यथा नको असतानाही तुमच्या जवळच्या व्यक्तींसोबत वाद होऊ शकतात.
मिथुन: यंदाच्या चंद्र ग्रहणाचा सर्वात जास्त प्रभाव हा मिथुन राशीवर पडणार आहे. दुर्दैवाने हा प्रभाव नकारात्मक असेल. वाद, ताण तणाव यामुळे मानसिक स्वास्थ्य थोडे बिघडू शकते. मनःशांतीसाठी ध्यान व संयमित वागणूक आचरण करावी.
कर्क: चंद्रग्रहण कर्क राशीच्या व्यक्तींसाठी समाधानकारक असणार आहे. तुमच्या खर्चात काहीशी वाढ होईल मात्र हा खर्च योग्य गुंतवणुकीत केल्यास भविष्यात फायदा होईल, त्यामुळे संधी असल्यास दवडू नका. विनाकारण प्रवासाचा योग आहे.
सिंह: चंद्र ग्रहण या राशीच्या व्यतींसाठी नुकसानाचे संकेत घेऊन येणार आहे, खर्चावर नियंत्रण ठेवा, आर्थिक व्यवहार करण्याआधी पडताळणी करा अन्यथा मोठे नुकसान होऊ शकते.
कन्या: या राशीच्या व्यक्तींनी आपल्या तब्येतीची काळजी घ्यावी, प्रवास करताना खास दक्षता बाळगावी. ग्रहणाचा प्रभाव हा संमिश्र असेल.
तूळ: ग्रहणामुळे मानसिक त्रागा सहन करावा लागू शकतो. तुमचा राग एखाद्या संकटात पाडू शकतो त्यामुळे इतरांशी वाद घालणे टाळा. घरातील कामांचा व्याप वाढेल. प्रिय व्यक्तीशी तुमचे भांडण होऊ शकते.
वृश्चिक: ग्रहणाचा प्रभाव मर्यादित काळासाठी असेल, घाईगडबड न करता कामे पूर्ण कशी होतील याकडे जास्त लक्ष द्या. नोकरीच्या ठिकाणी सावधगिरीने वागा.
धनु: चंद्र ग्रहण धनु राशीच्या प्रभाव कक्षेत नसेल त्यामुळे या व्यक्तींसाठी हा दिवस नियमित दिवसांच्या समान असणार आहे.
मकर : या राशीसाठी ग्रहण म्हणजे आनंद वार्तांचा खजिना घेऊन येणार आहे. नावडत्या व्यक्तीशीही मैत्री होईल असा हा दिवस असणार आहे. मात्र आरोग्याच्या बाबत थोडी सावधानता बाळगा.
कुंभ : कुंभ राशींच्या व्यक्तींसाठी ग्रहण शुभ असेल. प्रेम संबंध, नातेवाईक व अन्य सर्व नात्यांशी जवळीक होईल असा योग आहे. आर्थिक व्यवहार घाईत करू नका. प्रॉपर्टी संबंधित निर्णय काळजीपूर्वक घ्या.
मीन: मीन राशीच्या व्यक्तींसाठी हा दिवस संमिश्र असणार आहे. एकीकडे तुम्हाला व्यापार व आर्थिक बाबतीत मोठाफायदा होऊ शकतो तर दुसरीकडे आरोग्याच्या समस्यांनी काहीसे त्रासले जाऊ शकता.