Sant Gadge Maharaj Quotes in Marathi: ज्या महापुरुषांचा आधुनिक भारताला अभिमान वाटायला हवा, त्यामध्ये राष्ट्रसंत गाडगेबाबा (Sant Gadge Baba) यांचे नाव अग्रस्थानी आहे. मानवतेचा खरा हितचिंतक आणि सामाजिक समरसतेचे प्रतीक कोणाला मानता येत असेल तर ते संत गाडगे. 23 फेब्रुवारी हा डेबूजी झिंगारजी जानोरकर किंवा बाबा गाडगे यांचा जन्मदिन. त्यांचे खरे नाव डेबूजी झिंगारजी जानोरकर होते. महाराजांचा जन्म 23 फेब्रुवारी 1876 रोजी महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुक्यातील शेडगाव गावात एका धोबी कुटुंबात झाला.
गाडगे महाराज हे प्रवासी सामाजिक शिक्षक होते. पायात फाटलेली चप्पल आणि डोक्यावर मातीची वाटी घेऊन ते पायी प्रवास करायचे आणि हीच त्यांची ओळख होती. गावात प्रवेश केला की गाडगे महाराज ताबडतोब गटारी आणि रस्ते साफ करायला सुरुवात करायचे आणि काम आटोपल्यावर गावातील स्वच्छतेबद्दल ते स्वतः लोकांचे अभिनंदन करायचे. 20 डिसेंबर 1956 रोजी महाराजांचे निधन झाले. गाडगे महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त WhatsApp Status, Images, Wallpapers द्वारे तुम्ही त्यांचे खालील प्रेरणादायी विचार सोशल मीडियावर तसेच मित्र-परिवारास शेअर करू शकता. (हेही वाचा - संत गाडगे बाबा यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्याविषयी काही आश्चर्यकारक तथ्ये, जाणून घ्या)
दान घेण्यासाठी हात पसरू नका,
दान देण्यासाठी हात पसरा.
- संत गाडगे बाबा
दुःखाचे डोंगर चढल्या शिवाय
सुखाचे किरण दिसत नाहीत.
- संत गाडगे महाराज
जो वेळेवर जय मिळवतो
तो जगावरही जय मिळवतो.
- संत गाडगे महाराज
माणसाचे खरोखर देव
कोण असतील तर ते
आई-बाप.
- संत गाडगे बाबा
दगड धोंड्यांची पूजा करण्यात
वेळ आणि शक्ती
वाया घालवू नका
- संत गाडगे महाराज
गाय सुखी, तर शेतकरी सुखी आणि
शेतकरी सुखी, तर जग सुखी.
म्हणूनच गोपालन, पशुपालन प्रेमाने करा
आणि सर्व प्राणिमात्रांवर दया करा.
हाच आजचा धर्म आहे.
- संत गाडगे बाबा
गाडगे बाबा लोकांकडून मिळालेल्या पैशातून महाराज गावोगावी शाळा, धर्मशाळा, रुग्णालये, प्राण्यांचे निवारे बांधत असत. गावांची स्वच्छता केल्यानंतर ते संध्याकाळी कीर्तनांचे आयोजन करत असत आणि त्यांच्या कीर्तनांद्वारे ते लोकोपयोगी आणि समाजकल्याणाचा संदेश देत असत. आपल्या कीर्तनात ते लोकांना अंधश्रद्धेच्या भावनांविरुद्ध प्रबोधन करत असतं.