Ram Navami 2022 Messages (PC - File Image)

Ram Navami 2022 Messages: पौराणिक मान्यतांनुसार, भगवान रामाचा जन्म चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवमीला झाला होता, जो हिंदू लोक रामनवमी म्हणून साजरा करतात. यंदा हा दिवस 10 एप्रिल रोजी येत आहे. रामाचा जन्म दुपारी झाला असे म्हणतात. त्यामुळे रामनवमीचे विधी दुपारीच केले जातात. नवरात्रीच्या 9 दिवसात माँ दुर्गेच्या 9 रूपांची पूजा केली जाते आणि शेवटी रामनवमी साजरी केली जाते.

या दिवशी भगवान राम आणि माता सीता यांची घरोघरी आणि मंदिरांमध्ये पूर्ण विधीपूर्वक पूजा केली जाते. राम नवमीनिमित्त खास मराठी Greetings, Wishes, Messages, Whatsapp Status शेअर करून तुम्ही आपल्या मित्र-परिवारास राम नवमीच्या शुभेच्छा देऊ शकता. यासाठी तुम्ही खालील ईमेजेस डाऊनलोड करू शकता. (हेही वाचा - Ram Navami 2022 Bhog List: रामनवमीच्या नैवेद्यासाठी खास मिठाई, व्हिडीओ बघा आणि झटपट बनवा)

श्री राम ज्यांचे नाव आहे,

अयोध्या ज्यांचे धाम आहे,

एक वचनी, एक वाणी,

मर्यादा पुरूषोत्तम,

अशा रघु नंदनाला आमचा प्रणाम आहे…

श्री राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!

Ram Navami 2022 Messages (PC - File Image)

दुर्जनांचा नाश करुन

कुशल प्रशासनाचा

आदर्श प्रस्थापित

करणारे मर्यादा पुरुषोत्तम,

श्री रामचंद्र यांना वंदन,

श्री रामनवमीच्या शुभेच्छा!

Ram Navami 2022 Messages (PC - File Image)

प्रत्येकाच्या जीवनात आणि

जगण्यात राम येवो.

मर्यादापुरुषोत्तम श्री प्रभू रामचंद्र

आपणांस आरोग्य, सुख, शांती

भरभरून प्रदान करो.

ही श्रीराम चरणी प्रार्थना

श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा..!

Ram Navami 2022 Messages (PC - File Image)

श्री रामनवमीच्या तुमच्या कुटुंबियांना

खूप खूप शुभेच्छा

प्रभू रामचंद्रांचा आशीर्वाद सदैव तुमच्यासोबत असू द्या.

तुमचे घर कायम आनंद, सौभाग्याने भरलेले राहू द्या.

पुन्हा एकदा श्री रामनवमीच्या शुभेच्छा!

Ram Navami 2022 Messages (PC - File Image)

त्याग , सत्यवचन , संस्कृती

आणि परंपरेचे जतन.

मर्यादा पुरुषोत्तम आणि

एक आदर्श शासक,

प्रेरणादायी राजा रामचंद्र .

रामनवमी च्या हार्दिक शुभेच्छा

Ram Navami 2022 Messages (PC - File Image)

भगवान राम हे विष्णूचे सातवे अवतार होते. त्रेतायुगात जेव्हा पृथ्वीवर राक्षसी शक्तींचा कोप आणि अत्याचार वाढले, तेव्हा राजा दशरथ आणि माता कौशल्या यांच्या पोटी श्रीहरीचा जन्म झाला. हा दिवस चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील नवमी होता. धर्मरक्षणासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य पणाला लावले आणि सद्वर्तनाचा आदर्श घालून त्यांनी स्वतःला एक आदर्श माणूस म्हणून सादर केले. यामुळेच त्यांना मर्यादा पुरुषोत्तम म्हणतात. कठीण काळातही प्रभू रामाने धर्माची बाजू सोडली नाही आणि समाजासमोर स्वतःला सिद्ध केले.