
Mahaparinirvan Din 2024 Messages: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना संविधानाचे जनक म्हटले जाते. 06 डिसेंबर 1956 रोजी त्यांचे निधन झाले. दरवर्षी 6 डिसेंबर हा बाबासाहेबांचा पुण्यतिथी महापरिनिर्वाण दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यामागचे कारण म्हणजे बाबा साहेबांना आदरांजली अर्पण करणे. महापरिनिर्वाण म्हणजे 'मृत्यूनंतरचे निर्वाण'. परिनिर्वाण हे बौद्ध धर्माचे मुख्य तत्व आणि ध्येय आहे. यानुसार जो व्यक्ती निर्वाण प्राप्त करतो तो सांसारिक आसक्ती, इच्छा आणि जीवनातील दुःखांपासून मुक्त राहतो. याशिवाय तो जीवनचक्रातूनही मुक्त राहतो.
महापरिनिर्वाण दिनाच्या दिवशी लोक बाबासाहेबांच्या स्मृतीस अभिवादन करतात. तुम्ही देखील महापरिनिर्वाण दिन 2024 कोट्स, महापरिनिर्वाण दिन व्हॉट्सॲप स्टेटस, महापरिनिर्वाण दिन मराठी संदेश सोशल मीडियाद्वारे शेअर करून क्रांतीसुर्याच्या स्मृतीस त्रिवार अभिवादन करू शकता.
महा मानव विश्वरत्न भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार
आणि बहुजनांचे उद्धारकर्ते भारताचे भाग्य विधाते
परम पूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर
यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन…
कोटी कोटी प्रणाम…!

न्याय मिळवून देण्यासाठी तो रात्रंदिवस झुरला..
दलितांच्या अंधाऱ्या दुनियेत तो एकटाच सुर्य ठरला..
“अरे गर्वाने देतो आम्ही त्याला देवाची जागा”
कारण एका महाराचा मुलगा,
अवघ्या ३३ कोटींना पुरला..
महापरिनिर्वाणदिनी महामानवास,
विनम्र अभिवादन!

दलितांचे ते तलवार होऊन गेले,
अन्यायाविरुद्ध प्रहार होऊन गेले,
होते ते एक गरीबच,
पण या जगाचा कोहिनूर होऊन गेले..
महापरिनिर्वाणदिनी महामानवास,
विनम्र अभिवादन!

एक उत्तम कलाप्रेमी, शिक्षणप्रेमी,
गुणवंत, बुद्धिमान असे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असलेल्या
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनी कोटी कोटी प्रणाम!

देशात एकता, समता, बंधुता नांदावी
म्हणून आयुष्यभर झटणाऱ्या महामानवाला
महापरिनिर्वाण दिनानिमित्त
कोटी कोटी प्रणाम!!!

डॉ. आंबेडकरांनी अनेक वर्षे बौद्ध धर्माचा अभ्यास केला आणि 14 ऑक्टोबर 1956 रोजी त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे अंतिम संस्कारही बौद्ध धर्माच्या नियमांनुसार करण्यात आले. दादर चौपाटी, मुंबई येथे डॉ. आंबेडकरांवर ज्या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात आले ते ठिकाण आता चैत्यभूमी म्हणून ओळखले जाते.