Happy Gudi Padwa 2025 Messages In Marathi (फोटो सौजन्य - File Image)

Happy Gudi Padwa 2025 Messages In Marathi: गुढी पाडव्याच्या सणापासून मराठी नववर्षाची सुरुवात होते. महाराष्ट्रात गुढीपाडव्याचा सण (Gudi Padwa 2025) मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील लोक उगादी प्रमाणेच हा सण साजरा करतात. गुढी पाडव्याचा दिवस चैत्र नवरात्रीची सुरुवात देखील करतो, जो नऊ दिवसांचा उत्सव आहे. या नऊ दिवसांत लोक माँ दुर्गेच्या नऊ रूपांची पूजा करतात. गुढीपाडव्याच्या सणापूर्वी लोक आपली घरे पूर्णपणे स्वच्छ करतात आणि सकारात्मक उर्जेचे स्वागत करण्यासाठी रंगीबेरंगी रांगोळ्या आणि आंब्याच्या पानांच्या तोरणांनी त्यांचे प्रवेशद्वार सजवतात.

गुढीपाडव्याच्या दिवशी विजयाची गुढी उभारली जाते. यंदा 30 मार्च रोजी गुढी पाडव्याचा सण साजरा केला जाणार आहे. गुढीपाडव्याला पुढील वर्ष समृद्ध राहावे यासाठी भगवान ब्रह्मा, भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची प्रार्थना केली जाते. यादिवशी लोक एकमेकांना गुढीपाडव्याच्या आणि हिंदू नववर्षाच्या शुभेच्छा देतात. तुम्ही देखील WhatsApp Status, Quotes, Wishes, Wallpaper द्वारे मित्र-परिवारास हिंदू नववर्षाच्या (Hindu New Year 2025) आणि गुढीपाडव्याच्या मराठमोळ्या शुभेच्छा पाठवू शकता. यासाठी तुम्ही खालील ग्रीटिंग्ज मोफत डाऊनलोड करू शकता.

राग रुसवे विसरुन

वाढवा नात्यातला गोडवा

एकत्र येऊन साजरा करुयात

सण गुढीपाडव्याचा

मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

Happy Gudi Padwa 2025 Messages In Marathi 1 (फोटो सौजन्य - File Image)

पालवी चैत्राची

अथांग स्नेहाची

जपणूक परंपरेची

उंच उंच जाऊ दे

गुढी आदर्शाची!

गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

Happy Gudi Padwa 2025 Messages In Marathi 2 (फोटो सौजन्य - File Image)

नेसून साडी माळून गजरा

उभी राहिली गुढी

नवं वर्षाच्या स्वागताची

गुढी पाडव्याच्या मंगलमय शुभेच्छा

Happy Gudi Padwa 2025 Messages In Marathi 3 (फोटो सौजन्य - File Image)

वसंताची चाहूल घेऊन येते

नववर्ष सर्वांच्या मनात

या निमित्ताने पुन्हा होऊ दे

हर्ष नववर्षाच्या चैतन्यमय शुभेच्छा

Happy Gudi Padwa 2025 Messages In Marathi 4 (फोटो सौजन्य - File Image)

निळ्या निळ्या आभाळी

शोभे उंच गुढी

नवे नवे वर्ष आले

घेऊन गुळसाखरेची गोडी

गुढीपाडव्याच्या शुभेच्छा!

Happy Gudi Padwa 2025 Messages In Marathi 5 (फोटो सौजन्य - File Image)

कडुलिंब आणि गुळाचा प्रसाद -

गुढी पाडव्याची एक अनोखी परंपरा म्हणजे कडुलिंबाची पाने, गूळ आणि चिंचेचे मिश्रण खाणे. हे जीवनातील कडू आणि गोड दोन्ही अनुभवांचा स्वीकार करण्याचे प्रतीक आहे. तसेच यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास मदत होते. गुढी पाडव्याला पारंपारिक महाराष्ट्रीय पदार्थ बनवले जातात, ज्यात प्रामुख्याने पुराण पोळी आणि श्रीखंड-पुरी चा समावेश असतो.