
Chhatrapati Sambhaji Maharaj Punyatithi Quotes 2025: शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म 14 मे 1657 रोजी किल्ले पुरंदर येथे झाला. राजपुत्र असल्यामुळे रणांगणावरील मोहिमा आणि राजकारणातील डावपेच यांचे बाळकडू त्यांना लहानपणापासूनच मिळाले होते. संभाजी महाराज अत्यंत धुरंदर राजकारणी होते. घल दरबारातील घडामोडी आणि राजकारण त्यांना लहान वयातच कळले. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाल्यानंतर 12 दिवसात जिजाऊंचे निधन झाले. त्यानंतर संभाजीराजांकडे मायेने लक्ष देणारे कोणी राहिले नाही.
छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या वडिलांप्रमाणेच सक्तीने धर्मांतर करणाऱ्या इंग्रज, पोर्तुगीज, व मुसलमान सत्ताधीशांना कडाडून विरोध केला. संभाजी महाराज रायगडाकडे रवाना होत असतानाच औरंगजेबाचा सरदार मुकर्रबखान याने महाराजांच्या नजीकच्या मदतीने संगमेश्वरावर हल्ला केला. त्यानंतर कवी कलश आणि संभाजींना पकडण्यात आलं. औरंगजेबाने संभाजी राजांना धर्म बदलण्यासाठी अतोनात यात्ना दिल्या. मात्र, संभाजी महाराजांनी मृत्यूला झुकवून आपल्या धर्माचे रक्षण केले आणि मृत्यूला हसतमुखाने स्विकारले. आजही त्यांचे कार्य प्रत्येत तरुणासाठी प्रेरणादायी ठरते. 29 मार्च रोजी संभाजी महाराजांची तिथीनुसार, पुण्यतिथी साजरी करण्यात येते. याला बलिदान दिन (Balidan Din) किंवा बलिदान मास (Balidan Maas) असंही म्हटलं जातं. संभाजी महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त Images, WhatsApp Status, Facebook Messages शेअर करुन शंभूराजांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करू शकता.
जेव्हा कधी वाटेल ना!
आयुष्यात खूप दुःख आहे,
एकदा फक्त छत्रपती संभाजी महाराजांना आठवा,
जाणीव होईल आपलं दुःख काहीच नाहीये!

कर्तृत्व एवढं महान असावं,
नुसता साज बघून स्वाभिमान जागा व्हावा,
!!धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज!!

माती तुळापुरची झाली, पावन तुझ्या रक्ताने,
ते साखळदंड झालेत, धन्य तुझ्या स्पर्शाने,
पाहुनी शौर्य तुझ पुढे, मृत्युही नतमस्तक झाला
स्वराज्याच्या मातीसाठी, माझा शंभूराजा अमर झाला.
छत्रपती संभाजी महाराजांना त्रिवार मुजरा !!

रूद्राचा अवतार
वाघाचा ठसा होता
अरे, सह्याद्रीला विचारा त्या
माझा शंभूराजा कसा होता
संभाजी महाराज यांना पुण्यतिथी निमित्त कोटी कोटी प्रणाम!

कोंढण्यास तानाजी गेला...
घोडखिंडीसाठी समोर बाजी आला...
महाराष्ट्र धर्म वाढवण्यासाठी
स्वराज्य रक्षक संभाजी जाहला...
छत्रपती संभाजी महाराजांना पुण्यतिथी दिनी विनम्र अभिवादन!
असामान्य शौर्याने लढा देणारे छत्रपती संभाजी महाराज हे उत्तम साहित्यिक आणि संस्कृत भाषेचे उत्तम जाणकारही होते. संभाजी महाराजांनी वयाच्या चौदाव्या वर्षी बुधभूषण-राजनीती हा संस्कृत ग्रंथ लिहिला. तथापि, गागाभट्टांनी समयनय हा ग्रंथ लिहून संभाजी महाराजांना अर्पण केला.