आज महाअष्टमी (Maha Ashtmi), ज्याला दुर्गाष्टमी (durga ashtmi) असेही म्हणतात. नवरात्री (Navratri) सणात आजच्या दिवसाला सर्वाधिक महत्व आहे. कारण आजचा माँ दुर्गा आणि तिच्या नऊ अवतारांना समर्पित आहेत. वाईटावर चांगल्याच्या विजयाचा करून भक्त देवीची आणि तिच्या नऊ रूपांची पूजा करतात. आज नवरात्राची आठवी माळ असून नवदुर्गेचे आठवं स्वरुप महागौरी देवीला (Mahagauri Devi) समर्पित आहे. तसेच आजचा रंग मोरपंखी (Peacock Green) आहे. नवरात्रीचा आठवा दिवस अष्टमी तिथी किंवा महाष्टमी व्रत म्हणून पाळला जातो. हिंदू पौराणिक कथेनुसार, देवी शैलपुत्री अत्यंत सुंदर होती आणि वयाच्या 16 व्या वर्षी तिचा रंग गोरा होता. तिच्या गोऱ्या त्वचेमुळे तिला देवी महागौरी म्हणून ओळखले जाऊ लागले. तिची तुलना शंख, चंद्र (Moon) आणि कुंदाच्या पांढर्या फुलाशीही केली जाते.
देवी महागौरी (Devi Mahagauri) बैलावर (Bull) आरूढ होते आणि त्यामुळे तिला वृषारुधा म्हणतात. तिला चार हात आहेत - उजव्या बाजूला एका हातात त्रिशूल आहे आणि दुसरा अभय मुद्रेत आहे. ती एका डाव्या हातात डमरू धारण करते आणि दुसरा वरद मुद्रेत ठेवते. देवी महागौरी नेहमी पांढरी (White) वस्त्रे परिधान करते म्हणून तिला श्वेतांबरधारा असेही म्हणतात. ती शुद्धता आणि शांतता यांचे प्रतीक आहे. (हे ही वाचा:- Saraswati Pujan 2022 Messages: सरस्वती पूजननिमित्त खास मराठी Greetings, Images, Wishes शेअर करून ज्ञानाच्या देवतेला करा प्रणाम!)
आजच्या दिवशीच दुर्गा मातेच्या आठव्या रुपाने महिषासुर राक्षसावर विजय मिळवला होता. म्हणून आज लोक या दिवशी महागौरीची पूजा करतात. देवी महागौरी आपल्या भक्तांना संपत्ती आणि समृद्ध जीवनशैली प्रदान करण्यासाठी आणि त्यांचे सर्व दुःख दूर करण्यासाठी ओळखली जाते. अष्टमीच्या दिवशी देवी महागौरीची पूजा केल्यास सर्व समस्या आणि पापांपासून मुक्ती मिळते. अष्टमी व्रतालाही महत्त्व आहे कारण ते समृद्धी आणि भाग्य आणते.भारताच्या काही भागात लोक अष्टमीच्या वेळी अस्त्र पूजा देखील करतात. अनेक भक्त त्यांच्या साधनांची प्रार्थना करण्यासाठी हा एक शुभ दिवस मानतात. याव्यतिरिक्त, माँ दुर्गेच्या शस्त्रांची पूजा स्त्री शक्तीचे प्रतीक म्हणून केली जाते.