
Saraswati Pujan 2022 Messages: नवरात्र हा हिंदूंचा प्रमूख सण आहे. नवरात्री हा संस्कृत शब्द आहे, ज्याचा अर्थ 'नऊ रात्री' असा होतो. या नऊ रात्री आणि दहा दिवसांमध्ये शक्ती/देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. दहावा दिवस दसरा म्हणून साजरा केला जातो. नवरात्र वर्षातून चार वेळा येते. माघ, चैत्र, आषाढ आणि आश्विन महिन्यात प्रतिपदेपासून नवमीपर्यंत हा उत्सव साजरा केला जातो. नवरात्रीच्या नऊ रात्रींमध्ये, महालक्ष्मी, महासरस्वती किंवा सरस्वती आणि महाकाली या तीन देवींच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. ज्यांची नावे आणि स्थाने अनुक्रमे नंदा देवी योगमाया (विंध्यवासिनी शक्तीपीठ), रक्तदंतिका (सथूर), शाकंभरी (सहरन), शाकंभरी (सहारण), दुर्गा (काशी), भीमा (पिंजोर) आणि भ्रामरी (भ्रमरांबा शक्तीपीठ) अशी आहेत.
नवरात्रीच्या आठव्या दिवशी माता सरस्वतीचे पूजन केले जाते. उद्या म्हणजेचं सोमवारी 3 ऑक्टोबर रोजी सरस्वतीचे पूजन केले जाते. नवरात्रीच्या सातव्या दिवशी देवी शारदेला आवाहन केले जाते. तसेच दुसऱ्या दिवशी अर्थात अष्टमीला सरस्वतीचे पूजन केले जाते. सरस्वती पूजननिमित्त खास मराठी Greetings, Images, Wishes शेअर करून ज्ञानाच्या देवतेला प्रणाम करण्यासाठी तुम्ही खालील ईमेज डाऊनलोड करू शकता.
सरस्वती माता तुमच्या जीवनात ज्ञान, किरण,
संगीत, सुख, शांति, धन, संपत्ति, समृद्धि
आणि प्रसन्नता आणेल.
सरस्वती पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा!

या देवी सर्वभूतेषु विद्या-रूपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥
सरस्वती पूजन च्या हार्दिक शुभेच्छा!

सरस्वती पूजन च्या निमित्ताने ज्ञानाची संपत्ती आपल्यापर्यंत पोहोचावी,
आपणा सर्वांना देवी सरस्वती पूजन च्या हार्दिक शुभेच्छा!

सर्व शिक्षणाचे दिवे लावू, निरक्षरांना शिक्षित करूया,
समतेचे समर्थन करूया, झोपलेल्यांना जागे करूया.
सरस्वती पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा!

हे सरस्वती पूजन तुमच्या घरात
व आयुष्यात सुख संपत्ति आणि ज्ञानाचा
वर्शाव करेल अशी आमची तुम्हास व
तुमच्या परिवारास अनेक शुभेच्छा!

कमळाच्या पुष्पवर विराजमान देवी, देते ज्ञानाचा सागर व
म्हणे अगदी चिखलात कमळ व्हा, आपल्या कृतीतून महान बना.
तुम्हाला सरस्वती पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा!

नववा दिवस हा नवरात्रीचा शेवटचा दिवस असतो. याला महानवमी असेही म्हणतात. या दिवशी कन्यापूजा केली जाते. ज्यामध्ये नऊ मुलींची पूजा केली जाते. या नऊ मुलींना दुर्गा देवीच्या नऊ रूपांचे प्रतिनिधित्व मानले जाते. मुलींचा सन्मान आणि स्वागत करण्यासाठी त्यांचे पाय धुतले जातात. पूजेच्या शेवटी नवीन कपडे मुलींना भेट म्हणून दिले जातात.