पितृ पंधरवडा (Pitru Paksha) संपला की शेवटच्या दिवशी म्हणजेच पितृ आमावस्येच्या दुसऱ्या दिवशी शारदीय नवरात्री उत्सवास (Navratri Festival) सुरुवात होते. हिदू पंचांगानुसार अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्ष प्रतिपदेपासून दुर्गा देवीच्या पूजेचे पर्व सुरु होते. याला नवरोत्रोत्सव असेही म्हणतात. नवरात्री (Navratri 2021) मध्ये दुर्गा देवी नऊ रुपांमध्ये असते असे सांगतात. या काळात दुर्गा देवी शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्रि, महागौरी आणि सिद्धिदात्री या नऊ रुपांमध्ये क्रमश: असते असे म्हणतात. दरम्यान, नवरात्रोत्सवादरम्यान जर तुम्हाला कोणास शुभेच्छा द्यायच्या असतील तर त्यासाठी Navratri 2021 WhatsApp Messages, Facebook Greetings, Quotes, HD Images, GIFs आणि Wallpapers इथे देत आहोत. ज्या आपण विनाशुल्क डाऊनलोड करु शकतात.
महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड, गुजरात आदी राज्यांसह देशभरात नवरात्रोत्सव साजरा केला जातो. या काळात अनेक ठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. यंदाच्या वर्षी गुरुवार,शुक्ल प्रतिपदा म्हणजेच 7 ऑक्टोबरला शारदीय नवरात्री उत्सवास सुरु होत आहे. या दिवशी घटस्थापना आणि दुर्गादेवीची प्रतिष्ठापणा होते. काही लोक या दिवसांपासून वृत आणि उपवासही ठेवतात. (हेही वाचा, Navratri Colours 2021 for 9 Day: शारदीय नवरात्रोत्सवात यंदा कोणत्या दिवशी कोणत्या रंगाची साडी परिधान कराल? पहा संपूर्ण यादी)
यंदाच्या वर्षी नवरात्री आठ दिवसांची आहे. कारण अश्विन शुक्ल षष्टी तितीचा क्षय होत आहे. त्यामुळे यंदा आठच दिवसांची नवरात्री आहे. नवारात्रीनंतर अष्टमीचे महत्त्व मोठे असते. याला दुर्गाष्टमी किंवा महाष्टमी असेही म्हणतात. यंदाच्या वर्षी दुर्गाष्टमी 13 ऑक्टोबर (बुधवारी) या दिवशी येते आहे. या दिवशी मगागौरीचे पूजन होते.
दरम्यान, यंदाच्या वर्षी दसरा म्हणजेच विजयादशमी 15 ऑक्टोबर (शुक्रवारी) येत आहे या दिवशी रावण दहन होते. रामलीलामध्ये रावन वध हा पारंपरीक उत्सव असतो. या दिवशी दूर्गादेवीच्या मुर्तीचेही विसर्जन होते. वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून हा दिवस साजरा होतो.