Navratri Colours 2021 for 9 Day: शारदीय नवरात्रोत्सवात यंदा कोणत्या दिवशी कोणत्या रंगाची साडी परिधान कराल? पहा संपूर्ण यादी

Navratri 2021 Colours for 9 Days: गणपती बाप्पाला निरोप दिल्यानंतर नवरात्रोत्सवाचे वेध लागतात. आता नवरात्रोत्सव सुरु होण्यास अवघे काही दिवस उरले आहेत. आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नऊ दिवस नवरात्रोत्सव साजरा केला जातो. हे दिवस अतिशय आनंदाचे, उत्साहाचे आणि भक्तीमय असतात. यंदा नवरात्रोत्सव गुरुवार, 7 ऑक्टोबर पासून सुरु होत आहे. नवरात्रोत्सवात दांडीया, गरबा यासोबत नऊ रंगाचे कपडे घालण्याची महिला वर्गामध्ये उत्सुकता असते. नऊ दिवसांच्या या उत्सवात प्रत्येक दिवशी एक रंग दिलेला असतो. त्यानुसार साडी, वस्त्र परिधान केले जातात. अलिकडच्या काळात हा ट्रेंड सेट झाला आहे. विशेष म्हणजे याला केवळ महिलांकडूनच नाही तर पुरुषांकडून चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

ऑफिस, काम, कॉलेजमध्ये जाणाऱ्या महिला, मुली हे रंग अगदी आर्वजून पाळतात. तर जाणून घेऊया यंदा नवरात्रोत्सवात कोणत्या दिवशी कोणता रंग आहे. पहा दिवसानुसार रंगाची संपूर्ण यादी... (Shardiya Navratri 2021 Date: 7 ऑक्टोबरला घटस्थापना; यंदा नवरात्र 8 दिवसांची)

शारदीय नवरात्रोत्सव 2021 - 9 दिवसांसाठी रंग:

  • घटस्थापना/प्रतिपदा पहिला दिवस - 7 ऑक्टोबर - पिवळा (Yellow)
  • द्वितीया दुसरा दिवस - 8 ऑक्टोबर - हिरवा (Green)
  • तृतीया तिसरा दिवस - ऑक्टोबर 9 - राखाडी (Grey)
  • पंचमी चौथा दिवस - 10 ऑक्टोबर - नारंगी (Orange)
  • साष्टी पाचवा दिवस - 11 ऑक्टोबर - पांढरा (White)
  • सप्तमी सहावा दिवस - 12 ऑक्टोबर - लाल (Red)
  • अष्टमी सातवा दिवस - 13 ऑक्टोबर - रॉयल ब्लू (Royal Blue)
  • नवमी आठवा दिवस - 14 ऑक्टोबर - गुलाबी (Pink)
  • दशमीचा नववा दिवस - 15 ऑक्टोबर - जांभळा (Purple)

प्रतिपदा  शैलपुत्री देवी:

नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शैलपुत्री देवीची पूजा केली जाते. या वर्षी 7 ऑक्टोबर 2021 रोजी शैलपुत्री देवीचा दिवस आहे. या दिवशी मातेची पिवळ्या रंगाची वस्त्रे घालून पूजा करावी.

द्वितीया ब्रह्मचारिणी:

नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणी देवीची पूजा केली जाते. या वर्षी 8 ऑक्टोबर 2021 हा दिवस ब्रह्मचारिणी देवीचा असल्याने या दिवशी हिरव्या रंगाचे कपडे घालून मातेची पूजा केली जाईल.

तृतीया चंद्रघंटा:

नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा देवीची पूजा केली जाते. या वर्षी 9 ऑक्टोबर 2021 हा दिवशी तृतीया असल्याने या दिवशी चंद्रघंटा देवीला वंदन केले जाते. या दिवशी राखाडी कपडे घातले जातात.

चतुर्थी कुष्मांडा:

नवरात्रीच्या चौथ्या दिवशी कुष्मांडा देवीची पूजा केली जाते. या वर्षी 10 ऑक्टोबर, 2021 रोजी कुष्मांडा देवीची पूजा केली जाईल. या दिवशी नारंगी रंगाचे कपडे परिधान करावे.

पंचमी स्कंदमाता:

नवरात्रीच्या पाचव्या दिवशी स्कंदमाता देवीची पूजा केली जाते. या वर्षी 11 ऑक्टोबर 2021 रोजी स्कंदमाते देवीची पूजा केली जाईल. या दिवशी पांढऱ्या रंगाचे कपडे घाला.

षष्ठी कात्यायनी:

नवरात्रीच्या सहाव्या दिवशी कात्यायनी देवीची पूजा केली जाते. या वर्षी 12 ऑक्टोबर 2021 हा दिवस कात्यायनी देवीच्या पूजेचा असेल. या दिवशी लाल वस्त्र परिधान करून मातेची पूजा करावी.

सप्तमी कालरात्री:

नवरात्रीच्या सातव्या दिवशी कालरात्री देवीची पूजा केली जाते. या वर्षी 13 ऑक्टोबर, 2021 कालरात्री देवीच्या पूजेचा दिवस असेल. या दिवशी शाही निळ्या रंगाचे कपडे घाला आणि कालरात्री देवीची पूजा करा.

अष्टमी महागौरी:

नवरात्रीच्या आठव्या दिवशी महागौरीची पूजा केली जाते. या वर्षी 14 ऑक्टोबर, 2021, महागौरी देवीचा दिवस आहे. या दिवशी गुलाबी वस्त्र परिधान करून मातेची पूजा करा.

नवमी सिद्धिदात्री:

नवरात्रीच्या नवव्या दिवशी देवी सिद्धिदात्रीची पूजा केली जाते. या वर्षी 15 ऑक्टोबर 2021 हा सिद्धिदात्री देवीचा दिवस असेल. या दिवशी जांभळ्या रंगाचे कपडे घाला.

दुर्गा अष्टमी 13 ऑक्टोबर रोजी साजरी केली जाईल, तर महानवमी 14 ऑक्टोबर रोजी असेल. या निमित्ताने लोक कन्या पूजन देखील करतात. 15 ऑक्टोबर रोजी वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक म्हणून 'विजयादशमी' म्हणजेच दसऱ्याचा सण साजरा केला जाईल.