Navratri 9th Day Colour 2020: आजचा रंग जांभळा! शारदीय नवरात्रीच्या नवव्या दिवशी दसर्‍याला पारंपारिक साड्या, ड्रेस मध्ये पहा मराठमोळ्या अभिनेत्रींचा अंदाज!
Navratri 9th Day| Photo Credits Instagram

Navratri 9th Day Colour 2020: अश्विन शुक्ल प्रतिपदेपासून सुरू झालेल्या शारदीय नवरात्रीचा (Sharadiya Navratri) आज शेवटचा दिवस आहे. आज सर्वत्र दसरा आणि विजयादशमीचा सण साजरा करण्यात येणार आहे. नवरात्रीच्या नवव्या दिवशी सिद्धीधात्री देवीची पूजा अर्चा केली जाते. नऊ रात्री नऊ रंगांचं सेलिब्रेशन आज जांभळ्या रंगाने आपला निरोप घेणार आहे. दसरा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे. त्यामुळे या सणाच्या निमित्ताने तुम्ही सजायला, नटायला सज्ज होत असाल तर पहा अस्सल भारतीय पारंपरिक वस्त्रांमध्ये, महाराष्ट्राच्या मराठमोळ्या साड्यांमध्ये जांभळा रंग कसा खुलून दिसू शकतो. दरम्यान दसर्‍याला तुम्ही जांभळ्या रंगाच्या कपड्यांमध्ये तयार होत  असाल तर यंदा काही मिक्स अ‍ॅन्ड मॅचची थोडी वेगळी कॉम्बिनेशंस ट्राय करून बघा. या सणाच्या निमिताने प्रिया बापट या अभिनेत्रींचा पहा जांभळ्या रंगाच्या साड्या, ड्रेस मधील मोहक अंदाज! (वाचा - Happy Dussehra 2020 Wishes In Marathi: दस-याच्या शुभेच्छा Messages, WhatsApp Status द्वारे देऊन उत्साहात साजरी करा यंदाची विजयादशमी!)

बनारसी साडी मध्ये प्रिया बापट

खणाच्या साडीत तेजस्विनी पंडीत

सोनाली खरे

 

View this post on Instagram

 

Pal Pal Purple 💁🏻‍♀️ #coloroftheday #navratri2019 #sonalikhare

A post shared by Sonnali K khare (@iamsonalikhare) on

उमा पेंढारकर

 

View this post on Instagram

 

Diwalicha Hardik shubheccha....!!! 🌼🌼🌼🌼🌺🌺🌺

A post shared by Uma Hrishikesh (@uma_hrishikesh) on

नवरात्रीच्या प्रत्येक दिवशी ठरवून विशिष्ट रंग सार्‍यांनी परिधान करण्याच्या प्रथेमागे कोणताही धार्मिक संकेत नाही. केवळ नवरात्रीच्या स्त्री  शक्तीच्या जागरामध्ये त्यांच्यामध्ये एकात्मता जपण्यासाठी, वृद्धिंगत करण्यासाठी नऊ रात्री नऊ रंगाची संकल्पना पुढे आली. यंदाच्या नवरात्रीची सांगता नवव्या दिवशीच दसरा साजरा करून केली जाणार आहे. तुमच्या दसर्‍याच्या लाख लाख शुभेच्छा!