Mahavir Jayanti 2021 Images: आज देशभरातील जैन मंदिरात महावीर जयंतीचा उत्सव साजरा केला जात आहे. जैन धर्मातील 24 वे तीर्थंकर भगवान महावीर यांच्या जन्मोत्सवानिमित्त जैन मंदिरांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येते. त्याचसोबत या शुभ दिनी गरीबांना अन्न, कपडे, पैसे आणि अन्य अत्यावश्यक वस्तूंचे दान करतात. मात्र सध्याच्या कोरोनाच्या परिस्थितीमुळे हे सर्वकाही दिसून येणार नाही. हिंदू पंचागांनुसार, भगवान महावीर यांचा जन्म जवळजवळ 599 ईसा पूर्व चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथी वैशाली गणतंत्रच्या क्षत्रिय कुंडलपूर मध्ये झाला होता. जे सध्या बिहार मधील मुजफ्फरपुर जिल्ह्यात आहे. त्यांच्या वडीलांचे नाव सिद्धार्थ आणि आईचे नाव त्रिशला होते. लहानपणापासूनच महावीर भगवान यांना वर्धमान (Vardhaman) असे म्हटले जात होते.
भगवान महावीर यांच्या ज्ञान दर्शनाचे पाच प्रमुख सिद्धांत आहे. जे जैन धर्माचे आधारस्तंभ असल्याचे मानले जाते. त्यामध्ये सत्य, अहिंसा, अस्तेय, अपरिग्रह आणि ब्रह्मचर्य याचा समावेश आहे. महावीर जयंती निमित्तच्या शुभ दिनी तुम्ही मित्रांसह नातेवाईकांना मराठी Messages, SMS, WhatsApp Status, Wallpaper,Greetings च्या माध्यमातून द्या शुभेच्छा!(Mahavir Jayanti 2021: कोरोनाच्या पार्श्वभुमीवर महावीर जयंती साधेपणाने साजरी करण्याचे आवाहन; गृहविभागामार्फत मार्गदर्शक सूचना जारी
दरम्यान, महावीर स्वामी यांचा जन्म एका राज परिवारात झाला होता. त्यांच्या परिवारात धन-संपत्ती आणि ऐश्वर्याची कोणतीच कमतरता नव्हती. तरीही त्यांनी वयाच्या 30 व्या वर्षी सर्व सुखसोईंचा त्याग करत ज्ञान प्राप्तीसाठी अनवाणी पायाने चालत यात्रेला निघाले. कठीण तपस्या केल्यानंतर त्यांना सत्य, अहिंसा, श्रद्धा, विश्वास यांचे ज्ञान प्राप्त झाले.