Maha Shivratri Images| File Photo

देवांचा देव म्हणून भगवान शंकराची ओळख आहे. शिव शंकराच्या भक्तांसाठी महाशिवरात्र (Maha Shivratri) हा दिवस म्हत्त्वाचा असतो. यंदा 11 मार्च दिवशी भारतामध्ये महाशिवरात्र साजरी केली जाणार आहे. या दिवशी शिव शंकराच्या पूजेला विशेष महत्त्व असते. अनेक शिवभक्त या दिवसाचं औचित्य साधत महादेवाला प्रसन्न करण्यासाठी विविध व्रत, पूजा करतात. महाशिवरात्री दिवशी उज्जैनच्या महाकालेश्वर, काशी विश्वनाथ मंदिर आणि सोमनाथ मंदिरासोबत अनेक शिव शंकराच्या रूपातील मंदिरांमध्ये मोठी गर्दी असते. पण यावर्षी अद्याप कोरोना वायरसचा धोका टळलेला नसल्याने भाविकांना मंदिरांत प्रवेश रोखला आहे. पण महाशिवरात्री दिवशी तुम्ही मंदिरात जाऊ शकत नसलात तरीही घराबसल्या शंकराचं दर्शन घेण्यासाठी काही देवस्थानांनी ऑनलाईन माध्यमातून त्यांची दर्शनं जगभरातील भाविकांसाठी खुली केली आहेत.

यंदा महाशिवरात्री निमित्त महाकालेश्वर, काशी विश्वनाथ मंदिर आणि सोमनाथ मंदिरामध्ये तुम्ही व्हर्च्युअल माध्यमातून दर्शन घेऊ शकता. Mahashivratri 2021: जाणून घ्या नक्की कशी करावी महाशिवरात्री पूजा; भगवान शिवाला प्रसन्न करून घेण्यासाठी 'या' गोष्टींचे पालन करा.

काशी विश्वेश्वर मंदिर

काशी विश्वेश्वर मंदिरामध्ये लाईव्ह आरती मध्ये सहभागी होण्यासाठी मंदिराकडून खास अ‍ॅप बनवण्यात आले आहे. गूगल प्ले स्टोअर वर Shri Kashi Vishwanath Temple Trust या अ‍ॅपच्या माध्यमातून आरतीमध्ये सहभागी होता येतं. हे मंदिरं वाराणसी मध्ये अहिल्याबाई होळकर यांनी 1780 साली बांधले आहे.

सोमनाथ मंदिर

महाशिवरात्र दिवशी शंकराचे भक्त देवाला प्रसन्न करण्यासाठी उपवास करतात. भगवान शंकर हा देवांचा देव असून तो सृष्टीचा संरक्षकर्ता आहे. त्यामुळे त्याची कृपादृष्टी कायम रहावी याकरिता महाशिवरात्रीच्या सकाळपासूनच भोलेनाथाच्या मंदिरामध्ये मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी असते. भाविक शंकराच्या आवडीच्या गोष्टी त्याला अर्पण करून आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी प्रार्थना करतात.