Dr. BR Ambedkar Mahaparinirvan Din 2020 HD Images । (Photo Credit: Archived, Edited And Representative images)

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, थोर विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांचा स्मृतिदीन (Mahaparinirvan Din 2020 ) (पुण्यतिथी) महापरिनिर्वाण दिन (Mahaparinirvan Din) म्हणून ओळखला जातो. प्रतिवर्षी 7 डिसेंबर या दिवशी मुंबई येथील चैत्यभूमीवर महाराष्ट्रासोबतच देशविदेशातून असंख्य आंबेडकरी अनुयायी आणि बौद्ध धर्मिय येत असतात. डॉ. आंबेडकर यांना अभिवादन करतात. यंदा कोरोना व्हायरस संसर्गाचा धोका विचारात घेऊन राज्य सरकारने चैत्यभूमीवर गर्दी न करता डॉ. आंबेडकरांना घरुनच अभीवादन करण्याचे अवाहन केले आहे. अशा वेळी डॉ. आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी HD Wallpapers, Wishes, Messages, WhatsApp Stickers, Messages इथे देत आहोत. जे वापरुन तुम्ही करु शकता महामानवाला अभिवादन.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे 6 डिसेंबर 1956 या दिवशी दिल्ली येथे महापरिनिर्वाण म्हणजेच निधन झाले. त्यानंतर दुसऱ्याच दवशी त्यांचे पार्थीव मुंबई येथी दादर येथे चैत्यभूमी येथे आणण्यात आले. 7 डिसेंबर 1956 या दिवशी बौद्ध पद्धतीने त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तेव्हापासून डॉ. आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर जनसागर उसळतो. (हेही वाचा, Mahaparinirvan Din 2020 Banner: डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनी मराठी Messages, Images द्वारे या महापुरुषास करा विनम्र अभिवादन)

Dr. BR Ambedkar Mahaparinirvan Din 2020 HD Images । (Photo Credit: Archived, Edited And Representative images)
Dr. BR Ambedkar Mahaparinirvan Din 2020 HD Images । (Photo Credit: Archived, Edited And Representative images)
Dr. BR Ambedkar Mahaparinirvan Din 2020 HD Images । (Photo Credit: Archived, Edited And Representative images)
Dr. BR Ambedkar Mahaparinirvan Din 2020 HD Images । (Photo Credit: Archived, Edited And Representative images)
Dr. BR Ambedkar Mahaparinirvan Din 2020 HD Images । (Photo Credit: Archived, Edited And Representative images)
Dr. BR Ambedkar Mahaparinirvan Din 2020 HD Images । (Photo Credit: Archived, Edited And Representative images)
Dr. BR Ambedkar Mahaparinirvan Din 2020 HD Images । (Photo Credit: Archived, Edited And Representative images)

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या असंख्य अनुयायांसोबत निधनापूर्वी 14 ऑक्टोबर 1656 रोजी हिंदू धर्माचा त्याग करत बौद्ध धर्म स्वीकारला. ते बौद्ध गुरुही होते. त्यामुंळे लोक त्यांना बोधिसत्व मानतात. त्यातूनच बौद्ध संकल्पेनेत असलेला 'महापरिनिर्वाण' हा शब्द आंबेडकर यांच्या पुण्यतिथी निमित्त वापरला जातो. आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी देशविदेशातून 1 डिसेंबरपासूनच लोक मुंबईत चैत्यभूमीवर यायला सुरुवात करतात. 7 डिसेंबर पर्यंत लोकांच्या उपस्थितीचा हा आकडा तब्बल 25 लाखांपर्यंत पोहोचतो. या दिवशी महाराष्ट्र, उत्तर प्रदेश अशा राज्यांमध्ये सरकारी सुट्टी असते.