Dr.BR Ambedkar Mahaparinirvan Din 2020 Images: भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr.Babasaheb Ambedkar) यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी राज्यभरात 6 डिसेंबर हा दिवस महापरिनिर्वाण दिन (Mahaparinirvan Din) म्हणून साजरा केला जातो. 6 डिसेंबर 1956 रोजी डॉ. आंबेडकरांचे दिल्लीत निधन झाले होते. त्यानंतर त्याचा दुस-या दिवशी मुंबईतील चैत्यभूमीवर त्यांचे अंत्यसंस्कार करण्यात आले होते. म्हणून 6 डिसेंबर रोजी आंबेडकरांचे अनुयायी चैत्यभूमीवर महापुरुषास विनम्र अभिवादन करण्यास एकत्र जमतात. मात्र यंदा कोरोना व्हायरसमुळे आपल्याला सोशल डिस्टंसिंगचे पालन करायचे असल्याने आपण मोठ्या संख्येने जमू शकत नाही. मात्र तरीही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांनी निराश न होता सोशल मिडियाच्या माध्यमातून एकमेकांना संदेश पाठवून या महापुरुषाच्या स्मृतीस उजाळा देऊ शकतात.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे स्वत: एक मोठे विद्यापीठ होते. त्यांच्याकडून खूप गोष्टी शिकण्यासारख्या होत्या. अशा महान व्यक्तीचे विचार देखील तितकेच थोर होते. अशा या महापुरुषाच्या महापरिनिर्वाण दिनी सोशल मिडियाच्या माध्यमातून करा विनम्र अभिवादन
एक उत्तम कलाप्रेमी, शिक्षणप्रेमी, गुणवंत, बुद्धिमान असे अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनी कोटी कोटी प्रणाम!
हेदेखील वाचा- December 2020 Festivals, Events and Holiday Calendar: महापरिनिर्वाण दिन ते महालक्ष्मी गुरूवार व्रत, नाताळ यंदा कधी?
आपल्या देशासाठी आणि समाजासाठी अहोरात्र कार्य करून सामाजिक बांधिलकी जपणा-या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसारख्या महापुरुषास महापरिनिर्वाण दिनी विनम्र अभिवादन!
समाजपरिवर्तनाचे शस्त्र मानून ज्यांनी शिक्षणाचा केला प्रसार
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे होते हे थोर विचार
महापरिनिर्वाण दिनी त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन!
लोकांनी सत्याच्या मार्गावर चालावे यासाठी बनले ते मार्गदर्शक
वेळप्रसंगी योग्य वाट दाखविण्यासाठी बनले त्यांचे दिशादर्शक
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनी कोटी कोटी प्रणाम!
ज्यांच्या आचार-विचारांत भरली होती राष्ट्रनिष्ठा
ज्यांनी लोकांच्या न्यायहक्कासाठी प्रयत्नांची केली परिकाष्ठा
त्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस महापरिनिर्वाण दिनी विनम्र अभिवादन!
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्म स्वीकारत अनेकांना या धर्माची दीक्षा दिली. दरम्यान भारतातील अनुसूचित जाती, जमातींच्या लोकांना सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक स्तरावर सक्षम करण्यासाठी डॉ. आंबेडकरांनी भरीव कामगिरी केली आहे. या दिवसाचं औचित्य साधत त्यांच्या त्यांना आदरांजली अर्पण करा.