December 2020 Festivals, Events and Holiday Calendar: महापरिनिर्वाण दिन ते महालक्ष्मी गुरूवार व्रत, नाताळ यंदा कधी?
December Events 2020| File Photo

बघता बघता 2020 हे ग्रेगेरियन कॅलेंडर आता अंतिम टप्प्यात आलं आहे. पुढील 30 दिवसांतच  2020 ला अलविदा म्हणत 2021 चं स्वागत करण्यासाठी आपण सज्ज आहोत. नव्या वर्षाच्या स्वागतासाठी सारंच जग उत्सुक आणि आशादायी आहे. मागील वर्षभराचा काळ अनेकांसाठी अत्यंत कठीण होता. डिसेंबर महिना हा मुळातच मोठा उत्साहाचा आणि आनंदाचा असतो. थंडीची चाहूल आणि सोबतच सेलिब्रेशनचा आनंद यामुळे अनेकजण दरवर्षी डिसेंबर महिन्याची वाट पाहत असतात. मग यंदा सणांची, उत्सवांची या डिसेंबर महिन्यात कधी कशी रेलचेल सुरू आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्ही उत्सुक असाल तर पहा यंदाचं डिसेंबर 2020 मधील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन (Mahaparinirvan Diwas) ते खग्रास सूर्य सूर्यग्रहण (Surya Grahan), मार्गशीर्ष गुरूवार व्रत (Margashirsha Guruvar 2020) वेळापत्रक ते अगदी नाताळ (Christmas) आणि न्यू इयर इव्हच्या (New Year Eve) तारखांचे संपूर्ण वेळापत्रक! Bank Holidays List in December 2020: डिसेंबर महिन्यात 'या' दिवशी राहणार बँका बंद, येथे पाहा यादी.

डिसेंबर 2020 मधील महत्त्वाचे सण

3 डिसेंबर - संकष्टी चतुर्थी

6 डिसेंबर (रविवार) - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन

12 डिसेंबर ( शनिवार) - ज्ञानेश्वर महाराज समाधी उत्सव आळंदी

14 डिसेंबर- खग्रास सूर्यग्रहण

17 डिसेंबर - पहिला मार्गशीर्ष गुरूवार

20 डिसेंबर - चंपाषष्ठी

21 डिसेंबर - उत्तरायणारंभ

24 डिसेंबर -दुसरा मार्गशीर्ष गुरूवार

25 डिसेंबर - ख्रिसमस (नाताळ)

25 डिसेंबर - गीता जयंती, मोक्षदा एकादशी

29 डिसेंबर - श्री दत्त जयंती

31 डिसेंबर - तिसरा मार्गशीर्ष गुरूवार

31 डिसेंबर - गुरूपुष्यामृत योग

डिसेंबर महिन्यात यंदा महालक्ष्मीच्या उपसकांसाठी मार्गशीर्ष गुरूवारच्या व्रतांची मालिका घेऊन आला आहे. यंदा 15 डिसेंबर पासून मार्गशीर्ष महिन्याची सुरूवात होत आहे. या महिन्यात दर गुरूवारी महालक्ष्मीचं व्रत केले जाते. न्यू इयरच्या ईव्हला म्हणजेच 31 डिसेंबरला त्यापैकी एक दिवस आल्याने अनेकांचा पार्टीचा प्लॅन बिघडण्याची शक्यता आहे. यंदा कोविडच्या संकटाच्या छायेतच हा सेलिब्रेशनचा काळ जाणार असल्याने प्रत्येकाने खबरदारी घेत हे सेलिब्रेशन करण्यातच सार्‍यांचे हित आहे.