Bank Holiday | Representational Image (Photo Credits: PTI)

Bank Holiday List 2020: मधला शेवटचा महिना डिसेंबर सुरु झाला असून या महिन्यात अनकांची आउटिंगचे प्लान्स असतात, घरगुती समारंभ असतात, लग्नकार्य असतात आणि विशेष म्हणजे याच महिन्यात नाताळ (Christmas) आणि थर्टी फर्स्टचे (31st December) खास प्लान्स असतात. यासाठी पैशाची गरज निश्चितच भासते. त्यामुळे या महिन्यात आर्थिक व्यवहार करण्यासाठी तुम्हाला या महिन्यात बँका कधी बंद राहणार आहेत हे माहित असणे गरजेचे आहे. या महिन्यात अनेक राज्यात विशेष सणाकरिता बँकांना सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. यात सर्वांना 25 डिसेंबरला ख्रिसमस ची सुट्टी असल्याने देशभरातील बँका बंद राहणार आहेत.

या व्यतिरिक्त या महिन्यातील रविवार वगळता दुसरा आणि चौथा शनिवार देखील बँका बंद राहणार आहेत. हा शनिवार 12 डिसेंबर आणि 26 डिसेंबरला आला आहे. या दिवशी बँका बंद राहतील. त्याव्यतिरिक्त कोणत्या राज्यात कधी बँका बंद राहतील यावर एक नजर टाकूयात

हेदेखील वाचा- RTGS च्या वेळेत बदल ते LPG गॅस सिलेंडर किंमती सामान्यांच्या आर्थिक गणितावर परिणाम करणारे1 डिसेंबर 2020 पासूनचे नवे नियम

1 डिसेंबर- नागालँडमध्ये राज्य स्थापना तर अरुणाचल प्रदेश मध्ये फेथ दिवसाची सुट्टी

3 डिसेंबर- कर्नाटकात कनाकाडसा जयंती, त्रिपुरा मध्ये वर्ड डिसएब्ल्ड डे आणि गोव्यात Feast of St. Francis Xavier Day ची सुट्टी

5 डिसेंबर- शेख मोहम्मद अब्दुल्ला यांचा जन्मदिवस

12 डिसेंबर- दुसरा शनिवार

18 डिसेंबर- मेघालयात यू सोसो थाम ची पुण्यतिथी, छत्तीसगडमध्ये गुरुघासी दास जयंती

19 डिसेंबर- गोवा लिबरेशन डे, पंजाबमध्ये गुरु तेग बहादूर शहीद दिवस

25 डिसेंबर- देशभरात ख्रिसमस डे

30 डिसेंबर- सिक्कीममध्ये तामू लोसर

30 डिसेंबर- मणिपूरमध्ये न्यू ईयर इव सुट्टी

या दिवशी त्या त्या राज्यात बँका बंद राहणार आहेत. तर 25 डिसेंबरला देशभरात ख्रिसमस साजरा केला जाईल. त्यानिमित्त सर्व बँका बंद राहणार आहेत.