RTGS च्या वेळेत बदल ते LPG गॅस सिलेंडर किंमती सामान्यांच्या आर्थिक गणितावर परिणाम करणारे1 डिसेंबर 2020 पासूनचे नवे नियम
प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-File Image)

आजपासून नवा महिना सुरू झाला आहे. यंदा 1 डिसेंबर पासून आर्थिक व्यवहारांवर परिणाम करणारे महत्त्वाचे बदल होणार आहेत. दरम्यान एलपीजी गॅस ( LPG Cylinder Price), आरटीजीएस नियम (RTGS 24X7) ते अगदी रेल्वेचं वेळापत्रक आणि पॉलिसी प्रिमियम (Insurance Premium Change) यांच्यापर्यंत अनेक ठिकाणी बदल होणार असल्याने त्याचा परिणाम तुमच्या खिशावर होणार आहेत. आर्थिक व्यवहारांच्या दृष्टीने हे नियम महत्त्वाचे असल्याने तुम्ही त्यामधील बदल वेळीच जाणून घेणं आवश्यक आहेत.

RTGS 24 तास

ऑक्टोबर महिन्यात जाहीर करण्यात आलेल्या आरबीआयच्या पतधोरणामध्ये गर्व्हनर शक्तिकांत दास यांनी आता ऑनलाईन बॅंकिंगमध्ये पैसे ट्रान्सफर करण्यासाठी RTGS सेवा देखील 24 तास खुली राहणार असल्याचं सांगितलं आहे.

LPG Cylinder च्या किंमती

दर महिन्याला एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमती निश्चित केल्या जातात. यंदाच्या महिन्याच्या अद्याप अपडेट करण्यात आलेल्या नाहीत. कोरोना संकटकाळात सामान्यांसाठी दिलासादायक बाब म्हणजे त्या स्थिर ठेवल्या होत्या. तशाच पुढे देखील ठेवल्या जातील.

Insurance Premium मध्ये बदल शक्य

Insurance Premium धारकांना आता त्यांच्या प्रिमियममध्ये 50% कपात करणं शक्य होणार आहे.

नव्या ट्रेनच्या फेर्‍या

रेल्वे प्रशासनाने आता ट्रेनच्या वेळापत्रकामध्ये बदल केले आहेत. काही ट्रेनच्या फेर्‍या पूर्ववत केल्या आहेत. पुणे-जम्मू तावी ट्रेन पुन्हा धावणार आहे.

दरम्यान आता 2020 च्या शेवटाला सुरूवात झाली आहे. डिसेंबर महिना नववर्षाची चाहूल घेऊन आला आहे. या निमित्ताने तुमच्या आगामी वर्षासाठी नव्या आर्थिक बचतीची तुम्ही आखणी करत असाल तर हे नियम तुम्हांला त्याचं गणित बसवण्यासाठी फायदेशीर ठरू शकतात.