2 सप्टेंबर, 2019 रोजी, भाद्रपद शुद्ध चतुर्थीस गणरायाचे आगमन झाले आहे. आता एकूण 11 दिवस बाप्पा घरात विराजमान असणार आहेत. महाराष्ट्रात हा सण मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जातो. लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणपती उत्सवाला सुरुवात केली, त्यावेळी ज्या काही मंडळांची स्थापना झाली त्यातील एक म्हणजे मुंबईचा लालबागचा राजा. लालबागचा राजा हा फक्त महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशात प्रसिद्ध असा गणपती आहे. गणेशोत्सवाच्या काळात या गणपतीच्या दर्शनासाठी लोक कित्येक तास रांगेत उभे असतात. विविध क्षेत्रातील लोकांचे हे श्रद्धास्थान आहे. आज आम्ही खास आपल्यासाठी लालबागच्या राजाची लाईव्ह आरती आणि लाईव्ह दर्शन उपलब्ध करून देत आहोत.
लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ, गणेशगल्ली हे दक्षिण मुंबईतील लालबाग विभागातील सर्वात जुने व मानाचे पहिले मंडळ. या मंडळाची स्थापना सन 1928 साली झाली. दरवर्षी गणेशोत्सवामध्ये गणपतीचा मोठा उत्सव साजरा केला जातो. दरवर्षीचे देखावेही अतिशय नयनरम्य असतात. यावर्षी नितीन चंद्रकांत देसाई यांनी ‘चांद्रयान 2’चा आगळावेगळा देखावा उभा केला आहे. हे पाहून बाप्पा जणू अंतराळात असल्याचा भास निर्माण होतो. अशा या लालबागच्या राजाचे तुम्ही सोशल मिडीयाच्या माध्यमातून लाईव्ह दर्शन घेऊ शकता. यासाठी लालबागचा राजा मंडळाने यूट्यूब, त्यांची अधिकृत वेबसाईट, फेसबूक, ट्विटर अकाऊंट यांच्या माध्यमातून लाईव्ह दर्शन, मंडपातील आरती पाहण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. (हेही वाचा: Ganeshotsav 2019: अष्टविनायकामधील पहिला गणपती 'मोरगावचा मोरेश्वर'; जाणून घ्या मंदिर, मूर्ती आणि पौराणिक महत्व)
इथे घेऊ शकाल लालबागच्या राजाचे लाईव्ह दर्शन –
लालबागचा राजा हा नवसाला पावणारा गणपती म्हणून ओळखला जातो. यामुळेही दिवसरात्र भक्तांची रीघ इथे लागलेली असते. यंदा गणेशोत्सवाच्या काळात लालबागच्या राजाचे दर्शन 24x7 सुरु राहणार आहे. या मंडळाने सन 1877 साली सुवर्ण महोत्सवी वर्षात संपुर्ण हिंदुस्थानातील पहिली, सर्वात उंच म्हणजे 22 फुटी गणरायाची उंच उत्सव मुर्ती बनविली व लालबाग हे नाव जगविख्यात केले.