Lalbaugcha Raja 2019 First Look Live Streaming: लालबागचा राजा 2019 चं प्रथम दर्शन आज संध्याकाळी 7 वाजता, इथे पहा थेट प्रक्षेपण
Lalbaugcha Raja (Photo Credits: Twitter/ Lalbaugcha Raja )

Lalbaugcha Raja 2019 First Look :  लालबागचा राजा (Lalbaugcha Raja) सार्वजनिक मंडळ हे मुंबईतील लोकप्रिय गणेशोत्सव मंडळांपैकी एक आहे. यंदा या मंडळाचे 86 वे वर्ष आहे. नवसाला पावणारा म्हणून ओळख असलेल्या या गणपतीची पहिली झलक आज संध्याकाळी 7 वाजता सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहता येणार आहे. लालबाग राजा सार्वजनिक मंडळाच्या युट्युब चॅनलच्या माध्यमातून तुम्ही यंदा बाप्पाचं पहिलं रूप पाहता येणार आहे. यंदा लालबागच्या राजाच्या सजवटीसाठी चांद्रयान 2 ची थीम सजवण्यात आली आहे. लालबाग मधील मार्केट परिसरात जागा कमी असल्याने चांद्रयानाची सजावट करणं हे एक आव्हान होतं. मात्र यंदा नितीन देसाई आणि त्यांच्या टीमने हे आव्हानही स्वीकारत सजावट पूर्ण केली आहे. यामध्ये अंतराळयान, हलणारे अंतराळवीर यांचा समावेश आहे.

लालबागचा राजा 2019 ची पहिली झलक

यंदा लालबागचा राजा मंडळाच्या गणेशमूर्तीचा पाद्यपूजनाचा सोहळा 20 जून दिवशी पार पडला आहे. त्यानंतर मूर्ती साकारण्यास सुरूवात होते. आता यंदाच्या गणेशोत्सवासाठी लालबाग राजा मंडळ सज्ज झाले आहे. लालबागच्या राजाची मूर्ती संतोष कांबळी आणि त्यांचे कुटूंबीय घडवतात. 'नवसाला पावणारा गणपती' म्हणून त्याची ओळख असल्याने दहा दिवस अहोरात्र त्याच्या दर्शनाला गर्दी करतात. यंदा भाविकांना प्राणप्रतिष्ठेनंतर 2 ते 12 सप्टेंबर दरम्यान दर्शन खुले राहणार आहे.