Kumbh Mela 2019 Shahi Snan Dates: 2019 हे वर्ष अनेक दृष्टीने महत्त्वाचे असणार आहे. लोकसभा, विधानसभा निवडणूका, क्रिकेट वर्ल्डकप या महत्त्वपूर्ण गोष्टींसोबतच यंदा कुंभमेळाही आहे. 2019 चा कुंभमेळा प्रयागराज येथे 15 जानेवारी ते 4 मार्च या दरम्यान असणार आहे. गंगा, जमुना, सरस्वती या नद्यांमध्ये शाही स्नानासाठी अनेक हिंदू एकत्र जमतात. या नद्यांमध्ये अंघोळ केल्याने पापं धुतली जातात, असा समज जनमानसात रुढ आहे. हा एक पवित्र उत्सव असून यात शाही स्नानाला अत्यंत महत्त्व आहे. शाही स्नानामुळे मोक्ष प्राप्त होतो, अशी धारणा आहे. कुंभमेळ्याला जाणाऱ्या भाविकांसाठी रेल्वे प्रशासनाकडून 800 विशेष रेल्वे गाड्यांची सोय
अवकाशातील ग्रहांची स्थिती, आधात्मिक धारणा यावरुन शाही स्नानाचे काही दिवस ठरवले जातात. मकर संक्रांतीपासून शाही स्नानाला सुरुवात होईल. तर जाणून घेऊया शाही स्नानाचे खास दिवस....
पहिले स्नान: 15 जानेवारी
पहिले शाही स्नान 15 जानेवारीला होईल. या दिवशी 'मकर संक्रांत' असून सुर्य मकर राशीत प्रवेश करतो. त्यामुळे इतर ग्रहांकडे जाणारे पृथ्वीवरील मार्ग या दिवशी खुले होतात. म्हणून आत्मांना त्यांच्या स्वर्गीय निवासस्थानाकडे जाणे शक्य होते, अशी धारणा आहे. प्रयागराज कुंभमेळ्यासाठी रेल्वेने तिकीट बुकिंगमध्ये दिली खास सवलत !
पौष पौर्णिमा : 21 जानेवारी
पौष पौर्णिमेला म्हणजे 21 जानेवारीला दुसरे स्नान होणार आहे. या दिवशी अनेक भक्त देवाची पूजा करण्यासाठी मंदिरात जातात. या दिवशी पौर्णिमा असल्याने पूर्ण चंद्राचे दर्शन घडते आणि कल्पवसा (Kalpavasa) व्रताची सुरुवात होते. 2019 मध्ये जानेवारी ते मार्चदरम्यान लग्नांवर बंदी; योगी सरकारचा आदेश
मौनी अमावस्या- दुसरे स्नान : 4 फेब्रुवारी
मौनी अमावस्याच्या दिवशी कुंभमेळ्यात स्नानासाठी सर्वाधिक यात्रेकरू येतात. मनु ऋषींचा जन्मदिवस असल्याने हा शुभ दिवस मानला जातो. या दिवशी विश्वाची निर्मिती झाली, असे मानले जाते. या दिवशी ग्रहांची स्थिती सर्वात अनुकूल असल्याचे म्हटले जाते.
तिसरे स्नान : 10 फेब्रुवारी
बसंत पंचमी किंवा वसंत पंचमी या दिवशी वसंत ऋतुला सुरुवात होते. ऋतूतील बदल ज्ञानदेवी सरस्वतीच्या आगमनाचे संकेत देतात. त्यामुळे पवित्र पाण्यात स्नान केल्यानंतर लोक देवी सरस्वतीचे पूजन करतात.
माघी पौर्णिमा स्नान: 19 फेब्रुवारी
या दिवसाला 'महा माघी' असे म्हटले जाते. या दिवशी गुरु ब्रह्स्पतीची पूजा करतात. या दिवशी हिंदू देव गंधर्व स्वर्गापासून संगमापर्यंत प्रवास करतात, अशी धारणा आहे. या दिवशी पवित्र पाण्यात स्नान करणे अत्यंत शुभ मानले जाते. या दिवशी भक्तांना/यात्रेकरुंना मानवी स्वरुपात स्वर्गात जाण्याचा अनुभव मिळतो.
महाशिवरात्री : 4 मार्च
या दिवशी भगवान शंकराची पूजा केली जाते. या दिवसाची स्वर्गातही वाट पाहिली जाते, असे म्हटले जाते. हा कुंभमेळ्याचा शेवटचा दिवस असतो. या दिवशी कुंभमेळ्याचा अनुभव घेण्यासाठी अनेक भक्त येतात.
कुंभमेळ्यातील शाही स्नानाचे हे दिवस महत्त्वाचे आहेत. या प्रत्येक दिवसाचे विशेष महत्त्व असून प्रत्येक दिवसाबद्दल भक्तांची विशिष्ट धारणा आहे. कुंभमेळ्यात शाही स्नानाचे विशेष महत्त्व असून यानिमित्ताने अनेक साधू, संत, यात्रेकरु कुंभमेळ्यात सहभागी होतात. त्याचबरोबर कुंभमेळ्यात इतर अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.