Kumbh Mela 2019: कुंभमेळ्याला जाणाऱ्या भाविकांसाठी रेल्वे प्रशासनाकडून 800 विशेष रेल्वे गाड्यांची सोय
प्रतिकात्मक फोटो (Photo Credit: PTI)

2019 च्या कुंभमेळ्यासाठी मोठ्या संख्येने जाणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून रेल्वे प्रशासनाने विशेष जादा गाड्यांची सोय केली आहे. देशातील विविध स्थानकांपासून ते प्रयागराजपर्यंत 800 विशेष गाड्या चालविण्यात येणार आहेत. नियमित रेल्वेपेक्षा या विशेष गाड्यांची सोय उत्तर मध्य रेल्वेने (North Central Railway) ने केली आहे. प्रयागराज कुंभमेळ्यासाठी रेल्वेने तिकीट बुकिंगमध्ये दिली खास सवलत !

एनसीआर चे (NCR) पीआरओ अमित मालवीय यांनी सांगितले की, कुंभमेळ्यात भाविक आणि पर्यटकांना सहभागी होता यावे यासाठी सहा विशेष गाड्या अलाहाबादला देशाच्या विविध भागातून येतील. अलाहाबाद येथे होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी तब्बल 15 हजार कोटी रुपये मंजूर

अलाहाबाद ते नवी दिल्ली या प्रवासासाठी 5000 प्रवाशांसाठी चार ते पाच विशेष गाड्या चालविण्यात येणार आहेत. वाराणसी येथे भारतीय दिनाच्या कार्यक्रमात भाग घेतल्यानंतर प्रवाशांसाठी विशेष गाड्यांची सोय करण्यात आली आहे. या विशेष गाड्यांमध्ये 1400 कोच असतील. त्यामुळे एकाच वेळी अधिक प्रवाशांना प्रवास करणे सोपे होणार आहे. तसंच अलाहाबाद रेल्वे स्थानकांवर चार मोठी विश्रांतीगृहे उभारण्यात आली आहेत. त्यात सुमारे 10 हजार प्रवासी राहू शकतील.