
Kojagiri Purnima 2024 Messages in Marathi: हिंदू कॅलेंडरनुसार, अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षात येणाऱ्या पौर्णिमेला अश्विन किंवा शरद पौर्णिमा (Kojagiri Purnima 2024) म्हणतात. काही भागांमध्ये याला रास पौर्णिमा असेही म्हणतात. अनेक ठिकाणी हा दिवस कोजागिरी पौर्णिमा म्हणून साजरा होतो. यंदा बुधवारी, 16 ऑक्टोबर 2024 रोजी कोजागिरी पौर्णिमा साजरी होत आहे. पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी चंद्र सोळा कलांनी परिपूर्ण होतो आणि रात्रभर आपल्या किरणांनी अमृताचा वर्षाव करतो. त्यामुळे हिंदू धर्मात शरद पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. या दिवशी दूध आटवून त्यात केशर, पिस्ते, बदाम, चारोळी, वेलदोडे, जायफळ, साखर वगैरे गोष्टी घालून, लक्ष्मीदेवीला नैवेद्य दाखविला जातो. दुधात मध्यरात्री पूर्ण चंद्राची किरणे पडू देतात आणि मग ते दूध प्राशन केले जाते.
उत्तर भारतामध्ये या दिवशी खिरीचे खूप महत्त्व आहे. शरद पौर्णिमेच्या रात्री चंद्राच्या प्रकाशात खीर ठेऊन ती दुसऱ्या दिवशी सकाळी खाल्ली जाते. शरद पौर्णिमेला चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो. अंतराळातील सर्व ग्रहांमधून निघणारी सकारात्मक ऊर्जा चंद्रकिरणांद्वारे पृथ्वीवर पडते, असे समजले जाते. पौर्णिमेच्या चंद्रप्रकाशात खीर बनवून ती खुल्या आकाशाखाली ठेवण्यामागील शास्त्रीय तर्क असा आहे की, औषधी गुणधर्म असलेल्या चंद्राच्या किरणांमुळे खीरही अमृतसारखी होईल व याचे सेवन आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल.
या दिवशी करायच्या व्रतात रात्री लक्ष्मीची आणि ऐरावतावर बसलेल्या इंद्राची पूजाही केली जाते. पौराणिक कथांनुसार शरद पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीचा जन्मदिवस मानला जातो, ज्या दिवशी ती समुद्र मंथनातून प्रकट झाली होती.
तर अशा या कोजागिरी पौर्णिमेच्या खास Messages, Wishes, Images, SMS, WhatsApp Status पाठवून द्या मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा. (हेही वाचा: Kojagiri Purnima 2024: कोजागिरी पौर्णिमा; महत्त्व आणि पूजा विधी)





दरम्यान, ज्योतिषी आणि टॅरो कार्ड रीडर नितिका शर्मा यांनी सांगितले की, यावर्षी ही पौर्णिमा तिथी 16 ऑक्टोबर रोजी रात्री 08:40 वाजता सुरू होईल, तर पौर्णिमा दुसऱ्या दिवशी म्हणजेच 17 ऑक्टोबर रोजी दुपारी 04:55 वाजता संपेल. संध्याकाळी 05:04 वाजता चंद्रोदय होईल. हिंदू मान्यतेनुसार या पौर्णिमेच्या दिवशी साक्षात लक्ष्मीदेवी चंद्रमंडळातून येऊन पृथ्वीवर उतरते आणि मध्यरात्री 'को जागर्ति' (म्हणजे 'कोण जागत आहे') असे म्हणत मनुष्याचे प्रयत्न पहात पृथ्वीतलावर संचार करीत असते अशी धारणा आहे.