Mahatma Jyotirao Phule (Photo Credits: File Photo)

प्रत्येक काळामध्ये समाजसुधारकांना विरोध आणि संघर्ष यांचा सामना करावा लागतो. 19व्या शतकामध्ये भारतीय समाजामध्ये पसरत चाललेल्या अनेक अंधश्रद्धांबाबत आवाज उठवण्यासाठी महात्मा जोतिबा फुले ( Mahatma Jyotiba Phule) पुढे सरसावले होते. त्यांनी प्रामुख्याने स्त्रियांना सामोरं जावं लागणारा खडतर मार्ग सुकर करण्यासाठी आपलं आयुष्य वेचलं. त्याचं महिलांसाठी केलेलं काम पाहता ते 'देवदूता'समान होते. शिक्षणाची कवाडं खुली करण्यासोबतच धार्मिक रूढी-परंपरांमधूनही त्यांनी महिलांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले. नक्की वाचा: Jyotirao Phule Death Anniversary: भारतात स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या महात्मा फुले यांचा आज स्मृतीदिन; जाणून घ्या त्यांचे जीवनकार्य .

इंग्रजांचा विरोध पत्करला

ज्योतिराव गोविंदराव फुलेंचा जन्म पुण्यात झाली. माळी समाजात जन्माला आलेल्या ज्योतिबांनी समाजातील मागास वर्गीय लोकांना समान हक्क मिळण्यासाठी आपल्या लोकांप्रमाणेच इंग्रज सरकार सोबतही संघर्ष करावा लागला.

महिलांसाठी विशेष काम

ज्योतिबा फुले यांची महाराष्ट्रात काम करणारी सत्यशोधक समाज ही संस्था आजही महिलांसाठी झटत आहे. त्यांचा मुख्य उद्देश महिलांना शिक्षणाचा अधिकार मिळवून देणं हा आहे. त्यासोबतच त्यांनी बालविवाहाला देखील विरोध केला. विधवा विवाह समाजात स्वीकारण्यासाठी त्यांनी काम केलं. त्यांच्याकडून समाजात अंधश्रद्धा आणि रूढी परंपरांना हटवण्याचं देखील काम करण्यात आले.

स्त्रियांना शिक्षणाची कवाडं उघडी

ज्योतिबांनी आपलं सारं आयुष्य महिलांसाठी वेचलं आहे. स्त्री-पुरूष हा भेदाभेद दूर सारून त्यांनी 19 व्या शतकामध्ये स्त्रियांना शिक्षण मिळावं म्हणून शाळा सुरू केल्या. आपल्या पत्नीलाही शिक्षण देऊन या कामामध्ये सहभागी करून घेतलं.

ज्योतिबा फुले यांच्या शिक्षणकार्यामध्ये आणि समाजसुधारणेच्या मोहिमेमध्ये त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांनी देखील मोलाची भूमिका बजावली आहे.